India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : फॉर्माशी झगडणाऱ्या शुबमन गिलने ( Shubman Gill Century) दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावले. सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने २०९ धावा करून भारताला सावरले होते आणि दुसऱ्या डावात गिलने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. तिसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत भारताने ६ बाद २२७ धावा करून ३७० धावांची आघाडी घेतली आहे. पण, गिलच्या शतकाने २८ वर्षांपूर्वीच्या एका पराक्रमाची पुनरावृत्ती घडवून आणली आहे.
१४३ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दोन धक्के बसले. जेम्स अँडरसनने कर्णधार रोहित शर्मा (१३) आणि यशस्वी जैस्वाल ( १७) यांना बाद केले. श्रेयस अय्यर ( २९) व शुबमन गिल यांनी सेट होताना ११२ चेंडूंत ८१ धावा जोडल्या. टॉम हार्टलीने अय्यरला माघारी जाण्यास भाग पाडले. पदार्पणवीर रजत पाटीदार ( ९) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. पण, गिल खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याला अक्षर पटेलची साथ मिळाली.
दोघांनी इंग्लंडच्या फिरकी माऱ्याचा सहजतेने सामना केला. या दोघांनी भारताच्या धावांची गती कायम राखताना इंग्लंडवर दडपण निर्माण केले. गिलने १३२ चेंडूंत ११ चौकार व २ चौकाराच्या मदतीने शतक झळकावले. २४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर ( ३०) व विराट कोहली ( २१) यांच्याशी आज गिलने ( १०) बरोबरी केली. त्याने रवी शास्त्री व वीरेद्र सेहवाग ( ९) यांना मागे टाकले. २०१७नंतर भारतीय खेळपट्टीवर तिसऱ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. शोएब बशीरने भारताला मोठा धक्का देताना गिलची विकेट मिळवली. गिल १४७ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला. अक्षर पटेलही ४५ धावांवर हार्टलीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
यशस्वी व शुबमन यांनी तिसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली आणि वयाच्या पंचवीशीच्या आत एकाच कसोटीत शतक झळकावणारी ही भारताची दुसरी जोडी ठरली. यशस्वी २२ वर्षांचा, तर शुबमन २४ वर्षांचा आहे. यापूर्वी १९९६ मध्ये नॉटींगहॅम येथे
सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली यांनी इंग्लंडविरुद्ध असाच पराक्रम केला होता. तेव्हा हे दोघांचं वय २५ वर्षांखालील होतं.
Web Title: India vs England 2nd Test Live Update : Centuries for India's two young batters Shubman Gill and Yashasvi Jaiswal. The last time two under-25 batters scored a 100 for India in the same Test match was vs England in Nottingham in 1996 - Sachin Tendulkar and
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.