Join us  

भारताने बाजी पलटवली, गोलंदाजांनी कोंडी केली! लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडची बिकट अवस्था

India vs England 2nd Test Live Update : भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे बॅझबॉल पुन्हा अपयशी ठऱले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 11:37 AM

Open in App

India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे बॅझबॉल पुन्हा अपयशी ठऱले. झॅक क्रॉली, ऑली पोप व जो रूट यांनी आक्रमक फटके खेचले, परंतु आर अश्विनने यांना गुंडाळले. कुलदीप यादव, अक्षर पटेल व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी १ विकेट घेऊन इंग्लंडची कोंडी केली आहे. 

यशस्वी जैस्वालचे (२०९) द्विशतक, शुबमन गिलचे ( १०४) शतक आणि जसप्रीत बुमराहच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य उभे केले. समोर ६०० धावा जरी असल्या तरी बॅझबॉल क्रिकेट खेळायाचे हा निर्धार इंग्लंडने आधीच केला होता आणि दुसऱ्या डावात त्यांच्याकडून तसाच खेळ होताना दिसला. झॅक्र क्रॉली आणि बेन डकेट ( २८) यांनी इंग्लंडला आक्रमक सुरुवात करून दिली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात आर अश्विनने ही जोडी तोडली. नाईट वॉचमन म्हणून आलेला रेहान अहमदही झटपट २३ धावा करून चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. क्रॉलीसह त्याने ४५ धावा जोडल्या.  

क्रॉलीने पदलालित्य दाखवताना अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर चौकार खेचून अर्धशतक ( ८३ चेंडू) पूर्ण केले. ऑला पोप व क्रॉली हे बिनधास्त खेळ करत होते आणि भारताकडे संधीची वाट पाहण्यापलीकडे दुसरा पर्याय दिसत नव्हता. अश्विनने भारताला ती संधी निर्माण करून दिली. ऑली पोपचा ( २३) स्लिपमध्ये रोहितने शार्प कॅच टिपला आणि पाठोपाठ जो रूटही ( १६) धावा करून माघारी परतला. इंग्लंडविरुद्ध कसोटीत भारताकडून सर्वाधिक ९७ विकेट्सचा विक्रम अश्विनने स्वतःच्या नावावर केला. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध सर्वाधिक विकेट्सचा विक्रमही अश्विनच्या नावावर आहे.     कुलदीप यादवने इंग्लंडचा सेट फलंदाज क्रॉली याला पायचीत करून भारताला मोठे यश मिळवून दिले. क्रॉलीने १३२ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ७३ धावा केल्या. पाठोपाठ जसप्रीत बुमराहने जॉनी बेअरस्टोला ( ९) पायचीत करून इंग्लंडचे ६ फलंदाज १९४ धावांवर माघारी पाठवले. लंच ब्रेकनंतर भारताला विजयासाठी फक्त ४ विकेट्स घ्यायच्या आहेत, तर इंग्लंडला अजून २०५ धावांची गरज आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनजसप्रित बुमराह