India vs England 2nd Test Live Update : फॉर्माशी झगडणाऱ्या शुबमन गिलने शतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे... आधी श्रेयस अय्यरसोबत आणि आता अक्षर पटेलसोबत दमदार भागीदारी करून गिलने इंग्लंडची अवस्था वाईट केली आहे. भारताने तीनशेपार धावांची आघाडी घेऊन इंग्लंडची अडचण वाढवली आहे. त्यात आणखी एक भर पडली आहे. इंग्लंडचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज जखमी झाला असून त्याने मैदान सोडले आहे.
२२ मीटर पळून बेन स्टोक्सने अविश्वसनीय झेल घेताच प्रेक्षकांना दाखवलं बोट, Video Viral
भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिले. १४३ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या तीन षटकांत ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने धक्के दिले. कर्णधार रोहित शर्मा (१३) अँडरसनच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्या षटकात अँडरसनने यशस्वी जैस्वालला ( १७) स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. शुबमनने दोन जीवदान मिळाल्यानंतर खेळपट्टीवर जम बसवत त्याने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसोबत ११२ चेंडूंत ८१ धावा जोडल्या. टॉम हार्टलीने ही भागीदारी तोडली आणि बेन स्टोक्सने अप्रतिम झेल घेत अय्यरला २९ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. बेन फोक्सने यष्टींमागे रजत पाटीदारचा चांगला झेल त्याने टिपला.