जसप्रीत बुमराहच्या ६ विकेट्स, कुलदीप यादवची बात न्यारी; भारत इंग्लंडवर पडला भारी 

India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या डावात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 04:31 PM2024-02-03T16:31:16+5:302024-02-03T16:31:35+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Live Update : SIX-WICKET HAUL FOR JASPRIT BUMRAH,England 253 all out, india take 143 runs lead in first innings   | जसप्रीत बुमराहच्या ६ विकेट्स, कुलदीप यादवची बात न्यारी; भारत इंग्लंडवर पडला भारी 

जसप्रीत बुमराहच्या ६ विकेट्स, कुलदीप यादवची बात न्यारी; भारत इंग्लंडवर पडला भारी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या डावात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. भारताच्या ३९६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवात तर चांगली केली होती, परंतु अक्षर पटेलने फलंदाज झॅक क्रॉलीची विकेट घेऊन भारतासाठी पुनरागमाचे दार उघडले. त्यानंतर जसप्रीत बुमराह व कुलदीप यादवने  इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. जसप्रीतने दोन भन्नाट चेंडूंवर इंग्लंडच्या ऑली पोप व बेन स्टोक्स यांचे त्रिफळे उडवले. पण, इंग्लंडने ६ बाद १७२ धावांवरून चांगला खेळ केला आणि पिछाडी खूपच कमी केली. 

जसप्रीत बुमराहने 'दांडा' उडवला, हतबल बेन स्टोक्स बॅट फेकून उभा राहिला; विक्रम नोंदवला


भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा उभ्या केल्या आणि यापैकी २०९ धावा या एकट्या यशस्वी जैस्वालच्या होत्या. अन्य फलंदाजांना मिळून फक्त १८५ धावाच करता आल्या. यशस्वीने २९० चेंडूंत १९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने २०९ धावांची खेळी साकारली. इंग्लंडचे सलामवीर झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी ५९ धावांची सलामी दिली. कुलदीपने डकेटला ( २१ ) माघारी पाठवले. क्रॉलीने ७८ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ७६ धावा कुटल्या. अक्षर पटेलने ही विकेट मिळवली आणि त्यानंतर जसप्रीत व कुलदीपने कमाल केली. जसप्रीतने जो रूट ( ५), ऑली पोप ( २३) व जॉनी बेअरस्टो ( २५) यांना माघारी पाठवले. कुलदीपने बेन फोक्स ( ६) व रेहान अहमद ( ६) विकेट मिळवून कोंडी केली.


पण, बेन स्टोक्स व टॉम हार्टली यांनी संघर्ष करून फॉलो ऑन टाळला. मात्र, सेट झालेली जोडी बुमराहने तोडली आणि त्याने स्टोक्सचा ( ४७) त्रिफळा उडवला. बुमराहीची ही कसोटी क्रिकेटमधील १५० वी विकेट ठऱली आणि वकार युनिसनंतर ( २७) सर्वात कमी कसोटींत ( ३४) बुमराहने हा टप्पा ओलांडला. त्याने कपिल देव (३९) यांचा विक्रम मोडला. पाठोपाठ हार्टली ( २१) पण बुमराहच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बुमराहने दहाव्यांदा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. बुमराहने शेवटची विकेट घेऊन इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांत गुंडाळला आणि भारताला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळवून दिली. बुमराहने ४५ धावांत ६ विकेट्स घेतल्या. 

Web Title: India vs England 2nd Test Live Update : SIX-WICKET HAUL FOR JASPRIT BUMRAH,England 253 all out, india take 143 runs lead in first innings  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.