मोठी बातमी : शुबमन गिलला दुखापत, क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नाही आला, BCCI म्हणते... 

India vs England 2nd Test Live Update : भारत-इंग्लंड यांच्यातली तिसरी कसोटी निर्णायक वळणावर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:44 AM2024-02-05T09:44:52+5:302024-02-05T09:47:19+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Live Update : UPDATE: Shubman Gill hurt his right index finger while fielding on Day 2. He won't be taking the field today. | मोठी बातमी : शुबमन गिलला दुखापत, क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नाही आला, BCCI म्हणते... 

मोठी बातमी : शुबमन गिलला दुखापत, क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नाही आला, BCCI म्हणते... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातली तिसरी कसोटी निर्णायक वळणावर आली आहे. शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३९६ धावांचे तगडे लक्ष्य उभे केले आहे आणि कसोटीच्या चौथ्या दिवशी निकाल लागण्याची अपेक्षा आहे. पण, भारताचा फलंदाज गिल आज क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरणार नसल्याचे अपडेट्स बीसीसीआयने दिले आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना गिलच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याचे बीसीसीआयने ट्विट करून सांगितले. 


पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीत २५५ धावांची भर घालून भारताने विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य उभे केले. शुबमन गिलने भारताच्या दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरसह ( २९) ८१ आणि अक्षर पटेलसह ( ४५) ८९ धावांची भागीदारी करून धावसंख्येत मोठी भर घातली. गिल १४७ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला. आर अश्विनने ( २९) धावांचे योगदान दिल्याने भारताला २५५ धावांपर्यंत पोहोचता आले. टॉम हार्टलीला ४ विकेट्स मिळाल्या, तर रेहान अहमद व जेम्स अँडरसन यांनी अनुक्रमे ३ व २ विकेट्स घेतल्या.

 
झॅक्र क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून देताना अर्धशतकी भागीदारी करून दिली, परंतु आर अश्विनने त्यांना झटका दिला. बेन डकेट २८ धावांवर झेलबाद झाला आणि केएस भरतने अप्रतिम झेल टिपला. भरतचा झेल पाहून रोहित शर्मा खूपच आनंदी झाला. इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ६७ धावा केल्या होत्या आणि  त्यांना विजयासाठी आणखी ३३२ धावा करायच्या आहेत. 
 

Web Title: India vs England 2nd Test Live Update : UPDATE: Shubman Gill hurt his right index finger while fielding on Day 2. He won't be taking the field today.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.