India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : भारताच्या पहिल्या डावातील ३९६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. बेन डकेट स्वस्तात बाद झाला असला तरी झॅक क्रॉलीने भारतीय गोलंदाजांना हैराण केले होते. तो वन डे स्टाईल फटकेबाजी करताना चेंडू व धावा यांचा वेग कायम राखून होता आणि त्याच्या वेगात अक्षर पटेलने स्पीडब्रेकर लावला. श्रेयस अय्यरने अफलातून झेल घेतला आणि तो पाहून वन डे वर्ल्ड कप फायनलमधील ट्रॅव्हीस हेडने भारतीय कर्णधार रोहित शर्माचा घेतलेला झेल आठवला.
सुनील गावस्कर यांच्यानंतर आता यशस्वी जैस्वालच...! २२व्या वर्षी पाडला विक्रमांचा पाऊस
भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा उभ्या केल्या आणि यापैकी २०९ धावा या एकट्या यशस्वी जैस्वालच्या होत्या. अन्य फलंदाजांना मिळून फक्त १८५ धावाच करता आल्या. यशस्वीने २९० चेंडूंत १९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने २०९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत शुबमन गिल ( ३४ ) व रजत पाटीदार ( ३२) यांचा क्रमांक येतो. दुसऱ्या डावाच्या पहिल्या सत्रात भारताला केवळ ६० धावा जोडता आल्या. शोएब बशीर, जेम्स अँडरसन व रेहान अहमद यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाला घरच्या मैदानावर द्विशतकवीर असूनही कसोटीत ४०० हून अधिक धावा करता न आल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९८३ मध्ये अंशूमन गायकवाड यांनी पाकिस्तानविरुद्ध २०१ धावा केल्या होत्या आणि भारताला ३७४ धावाच करता आलेल्या. पोषक खेळपट्टीवर यशस्वी सोडून अन्य भारतीय फलंदाजाना खोऱ्याने धावा करता आल्या नाहीत, तेच इंग्लंडचे सलामवीर झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी दमदार सुरुवात करून देताना ९ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कुलदीप यादवने इंग्लंडला ५९ धावांवर पहिला धक्का दिला आणि बेन डकेट ( २१ ) माघारी परतला. क्रॉलीने ५२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
क्रॉली भारतीय गोलंदाजांची धुलाई करत होता आणि त्याला बाद करण्यासाठी रोहितने गोलंदाजीत बदल केला. अक्षर पटेलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्रॉलीकडून चूक झाली आणि श्रेयस अय्यरने अविश्वसनीय झेल घेतला. क्रॉली ७८ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ७६ धावांवर झेलबाद झाला आणि इंग्लंडला ११४ धावांवर दुसरा धक्का बसला.
Web Title: India vs England 2nd Test Live Update : Zak Crawley departs for 76 in 78 balls, A superb catch by Shreyas Iyer, England 114/2; Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.