ठळक मुद्देटीम इंडियानं घेतलेल्या मागील २४ DRS पैकी केवळ तीनच यशस्वी ठरलेत...
India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळालं. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांच्या दमदार खेळीवर दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पाणी फिरवले अन् बघताबघता ८ फलंदाज अवघ्या ९७ धावांवर माघारी परतले. त्यामुळे भारताचा पहिला डाव ३६४ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला मोहम्मद सिराजनं सलग दोन चेंडूवर धक्के दिले. याच सामन्यात एक विराट कोहली, रिषभ पंत आणि सिराज असा तिरंगी ड्रामा रंगलेलाही पाहायला मिळाला. DRSवरून रंगलेल्या या ड्राम्यानंतर भारतीय संघानं स्वतःचं हसू करून घेतलं.. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
पहिल्या दिवसाच्या ३ बाद २७६ धावांवरून आज डावाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच षटकात धक्का बसला. लोकेशनं २५० चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचून १२९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेला ( १) जेम्स अँडरसननं पुढील षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले. रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. पंत त्याच्या नेहमीच्या आक्रमक अंदाजात होता. पण, मार्क वूडनं त्याला बाद न होण्यासारख्या चेंडूवर माघारी जाण्यास भाग पाडले. पंत ३७ धावांवर झेलबाद झाला अन् जडेजासोबतची त्याची भागीदारी ४९ धावांवर संपुष्टात आली. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score
IPL 2021: मुंबई इंडियन्सचा ताफा पोहोचला दुबईत; मालक अंबानी यांनी खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल, See Photo
जडेजा एका बाजूनं खिंड लढवत होता. इशांत शर्मानं त्याच्यासोबत २६ धावांची भागीदारी करून धावसंख्या वाढवली, परंतु टीम इंडियाचे शेपूट गुंडाळण्यात इंग्लंडला फार कष्ट घ्यावे लागले नाही. जडेजा ४० धावांवर बाद झाला. भारताचा पहिला डाव ३६४ धावांवर संपुष्टात आला. अँडरसननं ६२ धावांत पाच विकेट्स घेतल्या. मार्क वूड व ऑली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score
प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. डॉम सिब्ली ( ११) व हसीब हमीद ( ०) यांना सिराजनं सलग दोन चेंडूंत माघारी पाठवले. रोरी बर्न्स व कर्णधार जो रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यांच्या डावातील २३व्या षटकात सिराजच्या चेंडूवर जो रूटसाठी LBWची अपील झाली. मैदानावरील पंचांनी नाबाद निर्णय दिला, पण सिराज DRS घेण्यासाठी विराटकडे आग्रह धरू लागला. यावेळी रिषभ मात्र त्याला तसे करू नकोस असेच सांगत होता. त्यावरून काही काळ विराटचा पारा चढला.
इंग्लंडच्या टीमसह भारतीय खेळाडू लाल टोपी घालून उतरले मैदानावर, जाणून घ्या त्यामागचं कारण!
पाहा मग काय घडले.
Web Title: India vs England 2nd Test : Mohammad Siraj convinced Virat Kohli to take the review of Joe Root, but Rishabh Pant was denying, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.