ठळक मुद्देदुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातून सलामीवीर शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे.
लंडन : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातून सलामीवीर शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज उमेश यादवलाही संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धवन आणि उमेश यांना संघाबाहेर काढल्यावर तंत्रशुद्ध चेतेश्वर पुजारा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आले आहे. दोन्ही संघ
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले आहे.