India vs England, 2nd Test Day 3 : इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियाला सकाळच्या सत्रात एकामागून एक धक्के दिले. फिरकीला पोषक खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली. मोईन अली व जॅक लिच यांनी पहिल्या सत्रात टीम इंडियाला पाच धक्के दिले. पण, आर अश्विन ( R Ashwin) व विराट कोहली ( Virat Kohli) यांनी पडझड थांबवली आणि भारताची आघाडी ३५१ धावांपर्यंत नेली. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारतानं ६ बाद १५६ धावा केल्या आहेत. अश्विन व विराट यांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. रोहित शर्मानं सामना सुरू असताना रिषभ पंतला मारली टपली, Viral Video पोस्ट करून वीरू म्हणतो...
मॅचचे हायलाईट्स...
- भारताला तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात पहिल्या काही षटकांतच दोन मोठे धक्के बसले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी तिसऱ्या दिवसाच्या डावाची सुरुवात केली. भारतानं पहिल्या डावात १९५ धावांची आघाडी घेत विजयाचा मजबूत पाया रचला होता. त्यावर ही जोडी धावांचा डोंगर उभा करेल, असा अंदाज होता. ५ तास, ५३ मिनिटांत संपली कसोटी मॅच, ११ विकेट्स घेत गोलंदाजानं रचला इतिहास!
- पण, सकाळच्या सत्रात घडले भलतेच. पुजारा ( ७) पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद होऊन माघारी परतला. ( Strange dismissal for Cheteshwar Pujara). त्यानंतर इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्स यानं सुरेख पद्धतीनं रोहित शर्माला यष्टिचीत करून माघारी पाठवले.
- मोईन अलीच्या ( Moeen Ali) गोलंदाजीवर पुजारानं पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सिली पॉईंटला उभ्या असलेल्या ऑली पोपनं चेंडू अडवत लगेत यष्टिरक्षकाकडे फेकला आणि फोक्सनं पुजाराला धावबाद केलं. पुजारा क्रिजवर परतला, परंतु त्याच्या हातून बॅट निसटली होती आणि त्याला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं. त्यानंतर जॅक लिचच्या गोलंदाजीवर फोक्सनं रोहितला ( २६) माघारी पाठवलं. Cheteshwar Pujara पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद; रोहित, रिषभही परतले माघारी, Video
- रिषभ पंतला ( ८) बढती देण्यात आली. पण, लिचनं त्याचा त्रिफळा उडवला. अजिंक्य रहाणेनं (१०) आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही मोईन अलीनं टिकू दिलं नाही. अक्षर पटेल ( ७) यालाही अलीनं बाद केलं.
- आर अश्विन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करताना आघाडी २५०+ पार नेली आहे. इंग्लंडला एकदाही भारतात कसोटी सामन्यात २५०+ धावांचा पाठलाग करता आलेला नाही. यापूर्वी त्यांनी १९७२मध्ये दिल्लीत २०७ धावा आणि १९८४मध्ये दिल्लीत १२५ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.IPL 2021 लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरची अष्टपैलू कामगिरी; २६ चेंडूंत चोपल्या ७७ धावा अन्...
- आर अश्विननं या सामन्यात विराटसह ७व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. इंग्लंडविरुद्ध १०००+ धावा आणि १०० विकेट्स घेणारा तो सातवा खेळाडू ठरला. यापूर्वी जॉर्ज गिफन ( ऑस्ट्रेलिया), माँटी नोबल ( ऑस्ट्रेलिया), गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज) , रिचर्ड हॅडली ( न्यूझीलंड), कपिल देव ( भारत), शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया), शॉन पोलॉक ( दक्षिण आफ्रिका) यांनी अशी कामगिरी केली आहे.'ओली पोप को लॉलिपॉप दो', 'बॉल घुमेगा तो ये झुमेगा', रिषभ पंतची यष्टींमागून फटकेबाजी, Video Viral
- कपिल देव यांच्यानंतर इंग्लंडविरुद्ध १००० धावा व १०० विकेट्स घेणारा अश्विन हा पहिलाच भारतीय आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धही अशी कामगिरी केली आहे.