India vs England 2nd Test: अश्विनला खुणावतोय १७ वर्षांपूर्वीचा विक्रम

India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आर. अश्विन खेळणार की नाही यावरून बरीच चर्चा रंगलेली. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने अश्विनला संधी दिली आणि त्यानेही विश्वास सार्थ ठरवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 09:04 AM2018-08-08T09:04:27+5:302018-08-08T09:38:44+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test: R. Ashwin want to break 17 Years Old Record | India vs England 2nd Test: अश्विनला खुणावतोय १७ वर्षांपूर्वीचा विक्रम

India vs England 2nd Test: अश्विनला खुणावतोय १७ वर्षांपूर्वीचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लॉर्ड्स- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आर. अश्विन खेळणार की नाही यावरून बरीच चर्चा रंगलेली. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने अश्विनला संधी दिली आणि त्यानेही विश्वास सार्थ ठरवला. अश्विनने पहिल्या डावात २६ षटकांत ६२ धावा देत ४ विकेट घेतल्या. दुसऱ्या डावातही त्याने इंग्लंडच्या सलामीवीरांना गुंडाळले. 

अश्विनच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही भारताला अवघ्या ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. आता लॉर्ड्स कसोटीसाठी अश्विन सज्ज झाला असून त्याला दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा विक्रम खुणावत आहे. अश्विनच्या नावे ५९ कसोटीत ३२३ विकेट्स आहेत आणि त्याला जलद ३५० विकेट्स घेणाऱ्या फिरकी गोलंदाजाचा मान पटकावण्याची संधी आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या आगामी चार कसोटीत त्याने २७ विकेट्स घेतल्या, तर तो मुरलीधरन यांचा विक्रम मोडू शकतो. श्रीलंकेच्या मुरलीधरनने २००१ मध्ये ६६ सामन्यांत ३५० विकेट्स घेतल्या होत्या आणि फिरकी गोलंदाजाने ३५० विकेट्सचा गाठलेला हा जलद टप्पा आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये अश्विनने सर्वात जलद ३०० विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला होता. त्याने ५४ कसोटींत हा पल्ला ओलांडून ऑस्ट्रेलियाच्या डॅनीस लिली यांचा विक्रम मोडला.

जलद ३५० विकेट्स टिपणारे पाच गोलंदाज 
मुथय्या मुरलीधरन ( श्रीलंका) ६६ सामने 
रिचर्ड हेडली ( न्यूझीलंड) ६९ सामने
डेल स्टेन ( द. आफ्रिका) ६९ सामने
डेनीस लिली ( ऑस्ट्रेलिया) ७० सामने 
ग्लेन मॅक्ग्रा ( ऑस्ट्रेलिया) ७४ सामने
 

Web Title: India vs England 2nd Test: R. Ashwin want to break 17 Years Old Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.