लंडन : लॉर्ड्सवर भारत आणि इंग्लंड यांच्यामधील दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. दोन्ही कर्णधार नाणेफेकीलाही आले नाहीत. त्याचबरोबर दोन्ही संघांमध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान देण्यात आले हेदेखील कळले नाही. पण तरीही देखील एका व्यक्तीच्या हाती दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत कोणते खेळाडू खेळतील, याची माहिती लागली आहे. त्यामुळे टॉसआधीच भारताची 'प्लेइंग इलेव्हन' फुटल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये आहे.
पाऊस पडल्यामुळे दोन्ही संघ एकही चेंडू न खेळता आराम करत होते. पण यादरम्यानच्या काळात दोन्ही संघात कोणते खेळाडू खेळतील याची यादी फुटली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीनुसार दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात एकही बदल केलेला दिसत नाही.
पहिला कसोटी सामना गमावल्यावर संघ निवडीवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात किमान दोन बदल अपेक्षित होते. पण या फुटलेल्या यादीनुसार भारतीय संघात कोणताच बदल झालेला दिसत नाही. पण इंग्लंडच्या संघात मात्र अपेक्षित बदल दिसत आहे. इंग्लंडच्या संघात ऑली पोप आणि ख्रिस वोक्स यांना स्थान देण्यात आले असल्याचे या यादीत दिसत आहे.
फुटलेल्या यादीनुसार दोन्ही संघभारत : मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी.
इंग्लंड : अॅलिस्टर कुक, किएटॉन जेनिंग्स, जो रूट, ऑली पोप, जॉनी बेअरस्टोव, जोस बटलर, ख्रिस वोक्स, सॅम कुरन, आदिल रशिद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.