India vs England 2nd Test Live : लोकेश राहुलची ऐतिहासिक खेळी, रोहित शर्माला शतकाची हुलकावणी; तरीही दोघांनी मिळून केला भारी पराक्रम!

India vs England 2021 2nd test match live cricket score : २०१९ नंतर कसोटी संघातून वगळल्यानंतर लोकेश राहुल भरपूर अभ्यास करून पुन्हा मैदानावर उतरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 11:51 PM2021-08-12T23:51:38+5:302021-08-12T23:53:18+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test : Stumps on Day 1, KL Rahul 127* and Rohit Sharma 83 helped them to reach 276 for 3 in the first innings | India vs England 2nd Test Live : लोकेश राहुलची ऐतिहासिक खेळी, रोहित शर्माला शतकाची हुलकावणी; तरीही दोघांनी मिळून केला भारी पराक्रम!

India vs England 2nd Test Live : लोकेश राहुलची ऐतिहासिक खेळी, रोहित शर्माला शतकाची हुलकावणी; तरीही दोघांनी मिळून केला भारी पराक्रम!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे१ जानेवारी २०२०पासून विराटनं १६ डावांत २४.१८ च्या सरासरीनं ३८७ धावा केल्या आहेत. मागील ४८ डावांमध्ये त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करता आलेले नाही. २३ नोव्हेंबर २०१९मध्ये त्यानं बांगलादेशविरुद्ध अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.

India vs England 2021 2nd test match live cricket score : २०१९ नंतर कसोटी संघातून वगळल्यानंतर लोकेश राहुल भरपूर अभ्यास करून पुन्हा मैदानावर उतरला. मयांक अग्रवाल जायबंदी झाल्यामुळे लोकेशला पहिल्या कसोटीत रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची संधी मिळाली अन् त्यातही त्यानं दोन्ही डावांत ८४ व २६ धावांची खेळी केली. आता ऐतिहासिक लॉर्ड्सवर त्यानं पहिल्या कसोटीत हुकलेल्या शतकाची कसर भरून काढताना Honor Board वर नाव कोरले. रोहितचेही शतक पूर्ण झाले असते तर आजचा दिवस हा भारतीयांसाठी सोन्याहून पिवळा ठरला असता. पण, या सलामीवीरांनी रचलेल्या मजबूत पायावर टीम इंडियानं पहिल्या दिवशी धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्णधार विराट कोहलीचाही फॉर्म परतलेला दिसत आहे. आशिया खंडाबाहेर एकाच कसोटीत दोन्ही सलामीवीरांनी ७५+ धावा करण्याची ही १९८६नंतरची पहिलीच वेळ ठरली. ( Rohit Sharma and KL Rahul becomes the first openers since 1986 to score 75+ in a Test outside Asia) 


नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं जेव्हा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हाच विराटच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला. त्यालाही प्रथम फलंदाजीच करायची होती. त्याचा हा आत्मविश्वात रोहित व लोकेश यांनी सार्थ ठरवला. या दोघांनी संयमानं खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित १४५ चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून ८३ धावांवर माघारी परतला आणि रोहित-लोकेश यांची भागीदारी १२६ धावांवर संपुष्टात आली. जेम्स अँडसरसनच्या अप्रतिम चेंडूनं रोहितचा त्रिफळा उडवला अन् टीम इंडियाला मोठा धक्का बसला. चेतेश्वर पुजारा ( ९) पुन्हा अपयशी ठरला. त्यालाही अँडरसननं बाद केले. Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live  


त्यानंतर लोकेश व कर्णधार विराट कोहली यांनी दमदार खेळ केला. विराटनं काही सुरेख फटके मारून फॉर्म परतल्याचे संकेत दिले. त्याचे कव्हर ड्राईव्ह फटक्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. लोकेशनं कसोटीतील ६ वे शतक पूर्ण केले. लॉर्ड्सवर शतक झळकावणारा तो तिसरा ( विनू मंकड, १९५२ व रवी शास्त्री, १९९०) भारतीय सलामावीर ठरला, तर एकूण दहावा फलंदाज ठरला.  SENA देशांमध्ये भारतीय सलामीवीरांमध्ये सर्वाधिक ८ शतकांचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यानंतर  विनू मंकड ( ३), लोकेश राहुल ( ३), वीरेंद्र सेहवाग ( ३) आणि रवी शास्त्री (३) यांचा क्रमांक येतो.  आशिया खंडाबाहेर मागील चार शतक करणारा भारतीय सलामीवीर म्हणजे लोकेशच.. त्यानं २०१५ मध्ये सिडनीत, २०१६ मध्ये किंग्स्टन, २०१८मध्ये दी ओव्हल आणि २०२१मध्ये लॉर्ड्सवर शतकी खेळी केली.  Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live  



पण, पहिल्या दिवसाचा शेवट जसा अपेक्षित होता, तसा झाला नाही. विराटचा फॉर्म परतलाय असे डोळ्यासमोर दिसत असताना दिवसातील अखेरच्या सहाव्या षटकात ऑली रॉबिन्सन यानं त्याला बाद केलं. लोकेश - विराट जोडीनं २०८ चेंडूंत ११७ धावा जोडल्या. विराट १०३ चेंडूंत ३ चौकारांसह ४२ धावांवर माघारी परतला. पुन्हा एकदा विराटच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागेल. लोकेश व अजिंक्य रहाणे यांनी टीम इंडियाचा आणखी एक धक्का बसू दिला नाही. लोकेश २४८ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२७ धावांवर नाबाद राहिला, अजिंक्यही १ धावांवर खेळत आहे. भारतानं पहिल्या दिवशी ३ बाद २७६ धावा केल्या आहेत. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score



Web Title: India vs England 2nd Test : Stumps on Day 1, KL Rahul 127* and Rohit Sharma 83 helped them to reach 276 for 3 in the first innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.