Join us  

India vs England 2nd Test: पावसाच्या आगमनापूर्वी भारताला दोन धक्के

पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताची 6.3 षटकात 11 बाद 2 अशी दयनीय अवस्था होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 4:34 PM

Open in App
ठळक मुद्देपहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडरसनने विजयला क्लीन बोल्ड केले आणि भारताला पहिला धक्का बसला.

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसरा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला आहे. पण यापूर्वीच भारतीय संघाला दोन धक्का बसले आहेत. भारताने आपले दोन्ही सलामीवीर गमावले आहेत. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताची 6.3 षटकात 11 बाद 2 अशी दयनीय अवस्था होती.

पहिल्याच षटकात मुरली विजय क्लीन बोल्डइंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर मुरली विजयचा अडसर दूर केला. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडरसनने विजयला क्लीन बोल्ड केले आणि भारताला पहिला धक्का बसला. विजयला यावेळी भोपळाही फोडता आला नव्हता. यावेळी भारताची अवस्था 1 बाद 0 अशी होती.

दोन चौकारानंतर लोकेशही तंबूतपहिल्या षटकात भारताला धक्का बसला होता. पण त्यानंतर सलामीवीर लोकेश राहुलने दोन चौकार लगावत चांगली सुरुवात केली होती. पण राहुलला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. अँडरसननेच राहुलला बाद करत दुसरा धक्का दिला. त्यावेळी भारताची 2 बाद 10 अशी अवस्था होती.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटक्रीडा