India vs England 2nd Test : विराट कोहलीनं इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला डिवचलं, पण सॅम कुरननं घेतला बदला, Video 

India vs England 2021 2nd test match live cricket score : चौथ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा भारताच्या ३ बाद ५६ धावा करून २९ धावांची आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 05:44 PM2021-08-15T17:44:18+5:302021-08-15T17:44:39+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test : verbal battle between Virat Kohli and James Anderson, butt Kohli has been dismissed by Sam Curran, Video  | India vs England 2nd Test : विराट कोहलीनं इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला डिवचलं, पण सॅम कुरननं घेतला बदला, Video 

India vs England 2nd Test : विराट कोहलीनं इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला डिवचलं, पण सॅम कुरननं घेतला बदला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामीवीर धावफलकावर २७ धावा असताना माघारी परतले. भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं ३९१ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली. पण, ही पिछाडी भरून काढण्यासाठी टीम इंडियाला दोन सलामावीरांची विकेट गमवावी लागली. कर्णधार विराट कोहलीलाही मोठी खेळी करण्यात पुन्हा अपयश आलं. इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन याला डिवचण्याचा विराटनं प्रयत्न केला. पण, युवा गोलंदाज सॅम कुरन यानं त्याचा वचपा काढून त्याला माघारी पाठवले. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

रोहित शर्मा इंग्लंडच्या जाळ्यात अडकला, सिक्सरसाठी विकेट गमावून बसला; Video

इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात आला. शमी दोन, इशांत शर्मा तीन आणि सिराजने चार विकेट्स घेतल्या. जो रूट ३२१ चेंडूंत १८ चौकारांसह १८० धावांवर नाबाद राहिला. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. रोहित शर्मानं सुरेख कव्हर ड्राईव्ह, पूल फटके मारून आक्रमक सुरुवात केली. पण, मार्क वूडनं भारताला धक्के दिले. लोकेश राहुल ३० चेंडूंत ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर १२व्या षटकात रोहित ( २१) बाद झाला. चेतेश्वर पुजारानं ३५ चेंडूनंतर पहिली धाव घेताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

Fact Check : विराट कोहलीची निवृत्तीची घोषणा?; महेंद्रसिंग धोनीसारखीच १५ ऑगस्टची केली निवड!

विराट आक्रमक खेळ करताना दिसला आणि काही सुरेख फटके मारून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली. पण, सॅम कुरनच्या बाहेर जाणारा चेंडू छेडण्याच्या नादात तो यष्टिरक्षकाच्या हाती झेलबाद होऊन माघारी परतला. चौथ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा भारताच्या ३ बाद ५६ धावा करून २९ धावांची आघाडी घेतली. विराट २० धावांवर बाद झाला. (  Lunch on Day 4 - India lead by 29 runs with 7 wickets in hand in the second innings with Pujara and Rahane in the middle.) 

पाहा व्हिडीओ... 




 

Web Title: India vs England 2nd Test : verbal battle between Virat Kohli and James Anderson, butt Kohli has been dismissed by Sam Curran, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.