लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहली महानतेच्या दिशेने वाटचाल करत आहे किंवा अधिक प्रगल्भ होत आहे, असे काही आजी-माजी क्रिकेटपटू म्हणत आहेत. कोहलीच्या बॅटमधून धावा तर निघतात, पण त्याच्या तोंडातून शिव्या मात्र थांबायचे नाव घेत नाही. असाच एक प्रकार लॉर्ड्सवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही घडला.
उपराहापूर्वी भारताने दोन्ही फलंदाजांना गमावले होते. त्यानंतर कोहलीसह चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर होते. त्यावेळी पुजाराने अँडरसनच्या आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ही गोष्ट घडली. अँडरसनने टाकलेला चेंडू पुजारा हलक्या हाताने खेळला. धाव निघण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याने दुसऱ्या टोकावर उभ्या असलेल्या कोहलीला त्याबद्दल विचारणा केली. कोहलीनेही लगेच धाव घेण्यासाठी क्रीझ सोडलं. तोही धावायला लागला. पण काही क्षणात त्याने आपला निर्णय बदलला. तोपर्यंत पुजारा अर्ध्या खेळपट्टीच्या पुढे आलाही होता. ही संधी इंग्लंडच्या खेळाडूंनी उचलली आणि पुजारा त्यांना धावचीत केले.
पुजाराची या साऱ्यामध्ये काहीच चूक नव्हती. त्याने या सामन्यात संघात पुनरागमन केले होते. त्यामुळे त्याच्यासाठी ही संधी महत्त्वाची होती. पण कोहलीमुळे तो धावबाद झाला होता. यावेळी पुजाराने कोहलीकडे पाहिले आणि ते पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. त्यावेळी कोहलीच्या तोंडून आपसूकच शिव्या बाहेर पडल्या.
नेमके काय घडले ते या व्हिडीओमध्ये पाहा