India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटी रंजक वळणावर आली आहे. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांनी टीम इंडियाच्या ताफ्यात आशेचा किरण निर्माण केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारताला मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. पण, अखेरच्या सत्रात हे दोघंही मागे परतले अन् टीम इंडिया किंचितशी बॅकफूटवर गेली आहे. अशात कर्णधार विराट कोहलीचा पारा पुन्हा चढलेला पाहायला मिळाला. लॉर्ड्सच्या बालकनितून तो सातत्यानं रिषभ पंत व इशांत शर्मा यांना काहीतरी खूणवताना दिसला. त्याच्या हातवाऱ्यातून, मी काय हवेशी बोलतोय का?, या शब्दात तो राग करत होता. त्याच्या तोंडातून अपशब्दही आल्याचे समजले. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते. लोकेश राहुल ( ५),
रोहित शर्मा ( २१) व विराट ( २०) माघारी परतल्यानंतर अजिंक्य-पुजारा जोडीनं टीम इंडियाला सावरले. या जोडीनं २९७ चेंडू खेळून काढली अन् १०० धावांची भागीदारी केली. मार्क वूडनं त्यांच्या भागीदारीला ब्रेक लावला. पुजारा २०६ चेंडूंत केवळ ४ चौकारांसह ४५ धावा करून माघारी परतला. दोन षटकांनंतर मोईन अलीच्या गोलंदाजीवर कट मारण्याच्या प्रयत्नात अजिंक्य झेलबाद झाला. त्यानं १४६ चेंडूंत ५ चौकारांसह ६१ धावा केल्या. मोईन अलीनं टीम इंडियाला आणखी एक धक्का देताना रवींद्र जडेजाचा ( ३) त्रिफळा उडवला. Eng vs Ind 2nd test live score board
विराट नेमकं काय बोलत होता?
चौथ्या दिवस अखेर भारतानं ६ बाद १८१ धावा करताना १५४ धावांची आघाडी घेतली आहे. खराब विद्युत प्रकाशामुळे चौथ्या दिवसांचा खेळ ८ षटकं आधीच थांबवण्यात आला. रिषभ १४ धावांवर खेळत आहे. रिषभ - इशांत जोडी मैदानावर असताना बालकनीतून विराट सातत्यानं त्या दोघांना खराब विद्युत प्रकाशाबद्दल खुणवत होता. त्याच्या या खाणाखुणाकडे दोघंही लक्ष देत नव्हते, अखेरीस त्याचा पारा चढलाच. त्यानं हनुमा विहारीला मैदानावर मॅसेज घेऊन पाठवले अन् त्यानंतर रिषभनं अम्पायरकडे तक्रार केली व खेळ थांबवण्याचा निर्णय झाला. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score
Web Title: India vs England 2nd Test : Virat Kohli and Rohit Sharma in the Lord's balcony saying light is not sufficient to play, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.