India vs England 2nd Test : लॉर्ड्सवरील टीम इंडियाचे विजयाचे हायलाईट्स; मॅचचा थरार अनुभवा एका क्लिकवर, Video 

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:16 AM2021-08-17T00:16:05+5:302021-08-17T00:18:18+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test : Watch highlights of Lord's Test, 10 English wickets and the special running celebrations | India vs England 2nd Test : लॉर्ड्सवरील टीम इंडियाचे विजयाचे हायलाईट्स; मॅचचा थरार अनुभवा एका क्लिकवर, Video 

India vs England 2nd Test : लॉर्ड्सवरील टीम इंडियाचे विजयाचे हायलाईट्स; मॅचचा थरार अनुभवा एका क्लिकवर, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या २७२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२० धावांवर गडगडला. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला रिषभ पंतची विकेट पडली तेव्हा टीम इंडियाचा डाव संपला असेच वाटले होते, पण अजबच घडले. त्यानंतर मोहम्मद सिराजनं जेव्हा जेम्स अँडरसनचा त्रिफळा उडवला तेव्हा विराट कोहलीसह टीम इंडियानं भारी जल्लोष केला. पाहूयात पाचव्या दिवसाचे हायलाईट्स्... 

लोकेश राहुलला Man Of The Match दिला म्हणून वीरू नाराज; म्हणाला, मी या खेळाडूला दिला असता!

भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुलच्या १२९, रोहित शर्माच्या ८३, विराट कोहलीच्या ४२, रवींद्र जडेजाच्या ४० व रिषभ पंतच्या ३८ धावांच्या जोरावर ३६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनं जो रूटच्या नाबाद १८०, जॉनी बेअरस्टो ५७ आणि रोरी बर्न्स ४९ यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ३९१ धावा करून २७ धावांची आघाडी घेतली. मोहम्मद सिराजनं ४, इशांत शर्मानं ३ आणि मोहम्मद शमीनं २ विकेट्स घेतल्या. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणे ( ६१) व चेतेश्वर पुजारा ( ४५) यांनी विक्रमी १०० धावांची भागीदारी करून टीम इंडियाला सावरले. त्यानंतर पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह ( ३४*) व मोहम्मद शमी ( ५६*) यांनी नाबाद ८९ धावांची भागीदारी करून संघाला मोठा पल्ला गाठून दिला. भारतानं ८ बाद २९८ धावांवर डाव घोषित करून इंग्लंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले.India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test


प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १२० धावांवर गडगडला. जो रूटनं ३३ धावा केल्या. मोहम्मद सिराजनं पुन्हा ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनं या सामन्यात १२६ धावा देताना ८ विकेट्स घेतल्या. त्यानं कपिल देव यांचा ८ बाद १६८ धावांचा विक्रम मोडला. आर पी सिंगनं ११७ धावा देत ७ विकेट्स घेतल्या होत्या. जसप्रीतनं तीन, इशांत शर्मानं दोन आणि शमीनं एक विकेट घेतली. पण, सामन्यानंतर मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार लोकेश राहुलला देण्यात आला. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score, Eng vs Ind 2nd test live score board

पाहा व्हिडीओ...



Web Title: India vs England 2nd Test : Watch highlights of Lord's Test, 10 English wickets and the special running celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.