लंडन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीइंग्लंडने आपला 12 सदस्यीत संघ जाहीर केला आहे. या संघात युवा फलंदाज ऑली पोपला पदार्पण करण्याची संधी मिळणार असल्याचे इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडताना दोन बदल इंग्लंडने केले होते. न्यायालयातील खटल्यामुळे बेन स्टोक्सला संघातून बाहेर काढण्यात आले होते. स्टोक्सच्या जागी अष्टपैलू ख्रिस वोक्सला इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात आले होते. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या डेव्हिड मलानलादेखील डच्चू देण्यात आला होता. मलानच्या जागी इंग्लंडच्या संघात 20 वर्षीय पोपला संधी देण्यात आली होती.
पोपने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळललेला नाही. इंग्लंडमधील सरे या कौंटी क्रिकेटमधून खेळताना पोपने दमदार कामगिरी केली आहे. सरे या संघातून पोप आतापर्यंत 15 प्रथम श्रेणी सामने खेळला आहे. या 15 सामन्यांमध्ये पोपने हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याची हीच कामगिरी पाहून त्याला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात पदार्पण करण्याची संधी देण्यात आलेली आहे.