Video: डीआरएस बोले तो धोनी रिव्ह्यू सिस्टिम; धोनीच्या हुशारीचा पुन्हा प्रत्यय

क्षणाचाही विलंब न घेता धोनीनं रिव्ह्यू घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 08:01 PM2018-07-17T20:01:06+5:302018-07-17T20:02:11+5:30

whatsapp join usJoin us
india vs england 3rd odi ms dhoni smartly uses drs | Video: डीआरएस बोले तो धोनी रिव्ह्यू सिस्टिम; धोनीच्या हुशारीचा पुन्हा प्रत्यय

Video: डीआरएस बोले तो धोनी रिव्ह्यू सिस्टिम; धोनीच्या हुशारीचा पुन्हा प्रत्यय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हेंडिग्ले: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी किती प्रभावीपणे डीआरएसचा वापर करतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. हेंडिग्लेत सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीला पंचांनी पायचीत ठरवलं होतं. मात्र धोनीनं डीआरएसच्या मदतीनं पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली आणि नेहमीप्रमाणे त्याचा हा निर्णय योग्य ठरला. तिसऱ्या पंचांनी धोनीच्या बाजूनं कौल दिला. 

तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करायला आलेल्या भारताचा निम्मा संघ 158 धावांमध्ये तंबूत परतला. इंग्लंडचा फिरकीपटू अब्दुल रशिदनं अचूक मारा करत भारताच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. 32 व्या षटकात धोनी रशिदचा सामना करत होता. या षटकातील तिसरा चेंडू धोनीला समजला नाही. बॅटची कट न घेता हा चेंडू धोनीच्या पायाला लागला. यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केलं आणि पंचांनी धोनीला बाद ठरवलं. 



पंचांनी बोट वर करताच धोनीनं क्षणाचाही विलंब न लावता डीआरएसचा वापर करत दाद मागितली. यानंतर अॅक्शन रिप्लेमध्ये चेंडू स्टम्पला लागत नसल्याचं दिसलं. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी धोनीला नाबाद ठरवलं. धोनी डीआरएस वापरण्यात किती हुशार आहे, याचा प्रत्यय यामुळे पुन्हा एकदा आला. याआधीही धोनीनं अनेकदा डीआरएसचा चाणाक्षपणे वापर केला आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असतानाही अनेकदा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यापूर्वी धोनीची मदत घेत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. 

Web Title: india vs england 3rd odi ms dhoni smartly uses drs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.