'हीट मॅन'चा इंग्लंडला तडाखा; भारताचा मालिका विजयाचा षटकार
ब्रिस्टल : रोहित शर्मा, 'हीट मॅन' नावाने प्रसिद्ध आहे. या 'हीट मॅन'च्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत इंग्लंडवर सात विकेट्स राखून विजय मिळवला. भारतासाठी हा सहावा मालिका विजय ठरला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने ट्वेन्टी-20 मालिकेत अपराजित पाहण्याचाही विक्रम केला आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने खिशात टाकली आहे. रोहितने 58 चेंडूंत 11 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 100 धावांची अफलातून खेळी साकारली.
रो'हिट'मॅनचा इंग्लंडला धक्का; भारताचा षटकारासह मालिका विजय
- रोहित शर्माचे 56 चेंडूंत दमदार शतक
- भारत मालिकेचा विजयी षटकार मारण्याच्या समीप
- भारताला विजयासाठी 12 चेंडूंत 9 धावांची गरज
- भारताला विजयासाठी 13 चेंडूंत 13 धावांची गरज
- हार्दिकचा षटकार...भारताला विजयासाठी 14 चेंडूंत 17 धावांची गरज
- भारताला विजयासाठी 16 चेंडूंत 24 धावांची गरज
- भारताला विजयासाठी 18 चेंडूंत 29 धावांची गरज
- भारताला विजयासाठी 24 चेंडूंत 44 धावांची गरज
- विराट कोहली OUT; भारताला तिसरा धक्का
- भारताच्या 14.1 षटकांत दिडशे धावा पूर्ण
- भारताला विजयासाठी सात षटकांत 64 धावांची गरज
- रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अर्धशतकी भागीदारी
- रोहित शर्माचे चौकारासह 28 चेंडूंत अर्धशतक
- षटकारानंतर लोकेश राहुल OUT; भारताला दुसरा धक्का
- लोकेश राहुलच्या षटकारासह भारताचे अर्धशतक
- रोहित शर्माचा फटक्यांचा धडाका; 16 चेंडूंत 33 धावा
- भारताला पहिला धक्का; शिखर धवन OUT
- भारताची दमदार सुरुवात, पहिल्या षटकात 11 धावा
भारताचे चांगले कमबॅक; पण विजयासाठी 199 धावांची गरज
ब्रिस्टल : भारताच्या गोलंदाजांना सुरुवातीला चांगला मारा करता आला नाही, पण दोन्ही सलामीवीरांना बाद केल्यावर मात्र त्यांनी सामन्यात दमदार कमबॅक केले. इंग्लंडचा पहिला फलंदाज 94 धावांवर बाद झालो होता, पण त्यानंतर 104 धावा करण्यासाठी त्यांना तब्बल आठ फलंदाज गमवावे लागले. जेसन रॉयच्या 67 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर इंग्लंडने धडाक्यात सुरुवात केली होती. पण चांगली सलामी मिळूनही इंग्लंडला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही. इंग्लंडने 20 षटकांत 9 बळी गमावत 198 धावा केल्या आहेत. भारताकडून हार्दिक पंड्याने भेदक मारा करत चार बळी मिळवले.
- भारताला विजयासाठी 199 धावांची गरज
- इंग्लंडला सातवा धक्का; डेव्हिड विली बाद
- हार्दिक पंड्याला चार विकेट्स; जॉनी बेअरस्टोलाही केले बाद
- इंग्लंडला पाचवा धक्का; बेन स्टोक्स OUT
- धोनीचा अप्रतिम झेल; हेल्स OUT
- इंग्लंडला तिसरा धक्का; मॉर्गन OUT
- इंग्लंड 10 षटकांत 2 बाद 111
- दीपक चहारला पहिल्याच सामन्यात बळी मिळवण्यात यश
- इंग्लंडला हादरा ; रॉय 67 धावांवर बाद
- इंग्लंडला पहिला धक्का; बटलर 34 धावांवर बाद
- जेसन रॉयचे 23 चेंडूंत षटकारासह अर्धशतक
- हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडने 22 धावा लूटल्या
- इंग्लंडच्या पाच षटकांत 51 धावा
- इंग्लंडच्या 225 धावा होतील, सचिन तेंडुलकरचे भाकित
- जोस बटलरची तडफदार फलंदाजी; बटलरच्या 9 चेंडूंत 21 धावा
भारताने नाणेफेक जिंकली, दिपक चहरला संधी
ब्रिस्टल : भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज रंगणार आहे. मालिकेत दोन्ही संघानी प्रत्येकी एक-एक विजय मिळवला आहे. आज होणाऱ्या निर्णायक सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघाचा इरादा असेल. दुसऱ्या सामन्यात तयारीनिशी उतरून फिरकीला पुरून उरणा-या इंग्लंडच्या विजयामुळे भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला यादवला आराम देण्यात आला आहे. तिसऱ्या सामन्या चहल आणि रैनावर फिरकी गोलंदाजीची धुरा आहे. भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरला आहे.
06:04PM - भारतीय संघ
06:04PM - इंग्लंडचा संघ
06:03PM - कुलदिप यादव आणि भुवनेश्वर कुमारला आराम, दिपक चहर आणि सिद्धार्थ कौलला संधी
06:00PM - भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
05:50PM - दिपक चहरला संधी