Join us  

India vs England 3rd Test Live : इंग्लंडचा दणदणीत विजय, टीम इंडियाला नमवून मालिकेत १-१ अशी बरोबरी 

india vs England 2021 3rd test match live cricket score : धावांच्या डोंगरापेक्षा तीन दिवस खेळपट्टीवर टिकून राहणे, हे टीम इंडियासमोर खरे लक्ष्य होते. इंग्लंडनं पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेत त्यांची बाजू मजबूत केली होती. त्यांच्या गोलंदाजांना फक्त लाइन लेन्थवर मारा करून टीम इंडियाच्या फलंदाजांना चूक करण्यास भाग पाडायचे होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 5:19 PM

Open in App

India vs England 2021 3rd test match live cricket score : धावांच्या डोंगरापेक्षा तीन दिवस खेळपट्टीवर टिकून राहणे, हे टीम इंडियासमोर खरे लक्ष्य होते. इंग्लंडनं पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेत त्यांची बाजू मजबूत केली होती. त्यांच्या गोलंदाजांना फक्त लाइन लेन्थवर मारा करून टीम इंडियाच्या फलंदाजांना चूक करण्यास भाग पाडायचे होते. तिसऱ्या दिवशी खेळपट्टीनं त्यांना फार साथ दिली नाही, परंतु चौथ्या दिवसाच्या पहिल्या दीड तासांच्या खेळात भारताच्या फलंदाजांनी चूकांचे सत्र सुरू केले. ऑली रॉबिन्सननं त्याचाच फायदा उचलताना पाच महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. २ बाद २१५ धावांवरून टीम इंडियाची घसरगुंडी सुरू झाली. भारताचे ८ फलंदाज ६३ धावांवर माघारी पाठवून इंग्लंडनं एक डाव ७६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ( From 215 for 2 to 278 for 10 - lost 8 wickets for just 63 runs within 100 minutes ) 

रोहित शर्मा ( ५९) व चेतेश्वर पुजारा यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताच्या धावसंख्येत भर घातली. रोहित व चेतश्वर पुजारा या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली चौथ्या दिवसाच पुजारा व कोहली दोघंही सावध पवित्र्यातच दिसले, परंतु ऑली रॉबिन्सनचा आता येणारा चेंडू सोडण्याचा पुजाराचा डाव फसला. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद दिले, परंतु कर्णधार जो रूटनं विलंब न करता लगेच DRS घेतला. लिड्सच्या मोठ्या स्क्रीनवर जेव्हा चेंडू स्टम्प्सवर आदळताता पाहताच इंग्लंडच्या खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. पुजाराला चौथ्या दिवसाच्या खेळात एकही धाव करता आली नाही. १८९ चेंडूंत १५ चौकारांसह तो ९१ धावांवर माघारी परतला. कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदीर होती. Ind vs Eng 3rd Test live, Eng vs ind 3rd test live score

कोहलीनं अर्धशतक पूर्ण केले, पण रॉबिन्सन यानं त्यालाही चालतं केलं. कोहली १२५ चेंडूंत ५५ धावांवर गेला. त्यानंतर जेम्स अँडरसननं टीम इंडियाला मोठा धक्का देताना रहाणेला ( १०) बाद केलं. रॉबिन्सनची गाडी सुसाट सुटली अन् रिषभ पंतला ( १)  बाद करून त्यानं विकेट्सचा चौकार खेचला. भारतानं २४ धावांत चार फलंदाज गमावले. रूटनं गोलंदाजीत बदल करताना चेंडू मोईन अलीच्या हाती सोपवला अन् त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अलीनं मोहम्मद शमीचा ( ६) त्रिफळा उडवून टीम इंडियाचा पाय आणखी खोलात टाकला. रॉबिन्सननं डावातील पाचवी विकेट घेताना इशांत शर्माला ( २) झेलबाद केले. कसोटी क्रिकेटमधील त्यानं दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या ( Ollie Robinson bags his second fifer in Test).

२ बाद २१५ वरून भारताची अवस्था ८ बाद २५७ अशी झाली. विराटची विकेट २३७ धावा असताना पडली अन् त्यानंतर २० धावांत पाच फलंदाज बाद झाले. क्रेग ओव्हर्टननं उर्वरित दोन विकेट्स घेत टीम इंडियाचा डाव २७८ धावांवर गुंडाळला.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीचेतेश्वर पुजारा
Open in App