Ind vs Eng Pink Ball Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. भारतीय संघाच्या फिरकीपटूंसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: लोळण घातली असून इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या ८१ धावांवर आटोपला आहे. यामुळे भारताला विजयासाठी अवघ्या ४९ धावांची आवश्यकता आहे.
टीम इंडियानंही पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. अक्षर पटेलनं ( Axar Patel) पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली याचा त्रिफळा उडवून आर अश्विनच्या ( R Ashwin) वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये ११४ वर्षांनंतर दुसऱ्यांदा कसोटी फिरकी गोलंदाजानं पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला. दोन्ही वेळेस भारतीय गोलंदाजांनी हा कामगिरी केली. इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. अक्षर पटेलनं ५ आणि आर अश्विननं ४ विकेटेस घेतल्या. भारताविरुद्धची कसोटी क्रिकेटमधील दुसरी निचांक कामगिरी ठरली. २०१५मध्ये नागपूर कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ ७९ धावांवर माघारी परतला होता.
फिरकीपटू अक्षर पटेलनं इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलंच जेरीस आणलं. अक्षर पटेलनं दुसऱ्या डावात ५ पाच विकेट्स घेतल्या. तर अश्विननं इंग्लंडच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. अक्षर पटेलनं पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली याचा त्रिफळा उडवून आर अश्विनच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये ११४ वर्षांनंतर दुसऱ्यांदा कसोटी फिरकी गोलंदाजानं पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला. दोन्ही वेळेस भारतीय गोलंदाजांनी हा कामगिरी केली.
अक्षर पटेल याच्याआधी चेन्नई कसोटीत आर अश्विननं चेन्नईत खेळलेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स याला झेलबाद केले होते. त्याचा झेल अजिंक्य रहाणेने टिपला होता. गेल्या १३३ वर्षांत असा कारनामा करणारा अश्विन हा तिसरा फिरकीपटू ठरला होता. त्यानंतर आता अक्षर पटेलनं ही कामगिरी केली.