india vs England 2021 3rd test match live cricket score : लीड्स कसोटीतील पहिल्या डावांतील चुका सुधारून टीम इंडियानं दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ७८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं ४३२ धावा घेताना ३५४ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात लोकेश राहुल ( ८) अपयशी ठरला असला तरी रोहित शर्मा ( Rohit Sharma) दमदार खेळ करत आहे. इंग्लंडचा कर्णधार व स्टार फलंदाज जो रूट याच्या चुकीमुळे रोहितला अर्धशतक झळकावण्यास मदत मिळाली आहे. रूटच्या चुकीमुळे इंग्लंडच्या प्रशिक्षकासह चाहतेही त्याच्यावर भडकले आहेत. India vs England 3rd Test Live, India vs England 3rd Test
भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गडगल्यानतंर इंग्लंडचे सलामीवीर हसीब हमीद ( ६८) आणि रोरी बर्न्स ( ६१) यांनी १३५ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार जो रूटनं पुन्हा एकदा दमदार खेळ केला. त्यानं डेविड मलानसह ( ७०) १३९ धावांची भागीदारी केली. रूट १६५ चेंडूंत १४ चौकारांसह १२१ धावा करून माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं मोईन अलीची ( २९) विकेट घेतली. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. Ind vs Eng 3rd Test live, Eng vs ind 3rd test live score
दुसऱ्या डावात रोहित व लोकेशनं आश्वासक सुरुवात करत काही सुरेख फटके मारले. लोकेशला अम्पायरनं पायचीत बाद दिले होते, पंरतु त्यानं लगेच रिव्ह्यू घेतला आणि त्यामुळे तो वाचला. पण, त्याचा फायदा उचलण्यात तो अपयशी ठरला. लंच ब्रेक होण्यापूर्वीच्या षटकात लोकेश ८ धावांवर माघारी परतला. रोहितनं खणखणीत षटकार खेचून कसोटीत भारताकडून सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले. वीरेंद्र सेहवाग ( ९०), महेंद्रसिंग धोनी ( ७८), सचिन तेंडुलकर ( ६९), रोहित शर्मा ( ६२*) आणि कपिल देव ( ६१) हे टॉप फाईव्हमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितचा हा ४३९वा षटकार ठरला. ख्रिस गेल ५५० व शाहिद आफ्रिदी ४७६ षटकारांसह अव्वल दोन क्रमांकावर आहेत. Eng vs Ind 3rd test live score board, Ind vs End 3rd test match live
रोहित ३८ धावांवर असताना पायचीतची अपील झाली. गोलंदाज ठाम होता की रोहित बाद आहे, परंतु कर्णधार जो रूटला DRSसाठी तयार करण्यापर्यंत १५ सेकंदाचा वेळ पूर्ण झाला अन् इंग्लंडला DRS घेता आला नाही. त्यानंतर रिप्लेत रोहित बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते. म्हणूनच इंग्लंडचा प्रशिक्षक ख्रिस सिलव्हरवूड यांनी डोक्यावर हात मारला. ( Joe Root ran out of time for the LBW apeal and in the end it was hitting the stumps. Chris Silverwood reaction tells all about the importance of Rohit's wicket.) रोहितनं त्यानंतर अर्धशतक पूर्ण केले.