india vs England 2021 3rd test match live cricket score : लॉर्ड्स पराभवानंतर इंग्लंडचा संघ आणखी जोमानं मैदानावर उतरला. बेन स्टोक्स. जोफ्रा आर्चर, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉड हे प्रमुख खेळाडू नसूनही इंग्लंडनं तिसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गावजलं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळला. कर्णधार जो रूटनं सलग तिसरं शतक झळकावून टीम इंडियाचा बॅक सिटवर ढकलले. ३५४ धावांची पिछाडी भरून इंग्लंडसमोर लक्ष्य ठेवणे अशक्यच होते, तरीही भारतीय चाहते कोणत्यातरी चमत्काराची प्रतीक्षा करत होते. पण, त्यांच्या इच्छेप्रमाणे काहीच झाले नाही. इंग्लंडनं एक डाव व ७६ धावांनी कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
१०० मिनिटांत टीम इंडियाचा खेळ खल्लास, ६३ धावांत ८ फलंदाज तंबूत अन् इंग्लंडचा मोठा विजय!
रोहित शर्मा ( ५९) व चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाच्या चाहत्यांना आशेचा किरण दाखवला. रोहित दुर्दैवीरित्या बाद झाला. पण, पुजारा व कर्णधार विराट कोहली या जोडीनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत खिंड लवढून दिलासादायक कामगिरी केली. चौथ्या दिवशी नव्या चेंडूने इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. पुजाराला एकही धावेची भर न घातला ९१ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर विराटही ५५ धावांवर बाद झाला अन् २ बाद २१५ धावांवरून टीम इंडियाची घसरगुंडी सुरू झाली. भारताचे ८ फलंदाज ६३ धावांवर माघारी परतले. इंग्लंडनं एक डाव ७६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ( From 215 for 2 to 278 for 10 - lost 8 wickets for just 63 runs within 100 minutes )