India vs England 3rd Test Live Updates Day 2 ( Marathi News ) : रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांच्या शतकाने भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. पदार्पणवीर सर्फराज खानने ६२ धावांची प्रभावी खेळी करून पदार्पण गाजवले आणि भारताने पहिल्या दिवशी ५ बाद ३२६ धावा उभ्या केल्या. इंग्लंडचा मार्क वूड भारी पडला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या अर्ध्यातासात भारताने दोन विकेट्स गमावल्याने चिंता वाढली होती, परंतु आर अश्विन व पदार्पणवीर ध्रुव जुरेल यांनी संयमी खेळ सुरू केला आहे.
यशस्वी जैस्वाल ( १०), शुबमन गिल ( ०) व रजत पाटीदार ( ५) हे पहिल्या सत्रात माघारी परतले. रोहित व जडेजा या जोडीने इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. रोहित १९६ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १३१ धावांवर झेल बाद झाला. त्याने आणि जडेजा या जोडीने चौथ्या विकेटसाठी विक्रमी २०४ धावांची भागीदारी केली. सर्फराज चांगले फटके खेचताना दिसला, परंतु त्याला ६६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६२ धावांवर माघारी जावे लागले. तो रन आऊट झाला. सर्फराज व जडेजा यांनी ७७ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात जेम्स अँडरसनने भारताला धक्का देताना नाईट वॉचमन कुलदीप यादवला ( ४) माघारी पाठवले.
जो रुटच्या गोलंदाजीवर शतकवीर रवींद्र जडेजा फसला आणि रुटच्या हातात सोपा झेल दिला. जडेजा २२५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११२ धावांवर बाद झाला. त्यानंतर पदार्पणवीर ध्रुव व आर अश्विन यांनी डाव सावरला आहे. पण, आर अश्विन सातत्याने खेळपट्टीच्या मधोमध पळत असल्याने अम्पायर जोएल विल्सन यांनी त्याला वॉर्निंग दिली आणि भारताला ५ धावांची पेनल्टी सुनावली. त्यामुळे इंग्लंड जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा त्यांच्या डावातीच सुरुवात ५ धावांनी झालेली असेल.
नियम काय सांगतो?
खेळाडूंच्या वर्तनासाठी कायदा ४२ अंतर्गत दंडात्मक धावा
नियम ४२ [१४ ] अन्वये पंचांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचे वर्तन अस्वीकार्य ठरवले तर एकतर संघाला पाच पेनल्टी धावा दिल्या जातात. लेव्हल १ च्या गुन्ह्यांसाठी अंपायर प्रथम संघाला चेतावणी देतील आणि त्याच संघाने पुनरावृत्ती झाल्यास दंड ठोठावला जाईल. कोणत्याही लेव्हल २, लेव्हल ३ ("यलो कार्ड") किंवा लेव्हल ४ ("रेड कार्ड") दिल्या जातील. गुन्ह्यासाठी पेनल्टी रन देण्यापूर्वी किंवा त्यानंतरच्या कोणत्याही लेव्हल १ च्या गुन्ह्यासाठी पेनल्टी रन देण्यापूर्वी कोणतीही चेतावणी दिली जात नाही
Web Title: India vs England 3rd Test Live update : 5 PENALTY RUNS! England will start their innings at 5/0, India batter R Ashwin is warned by the on-field umpire Joel Wilson for running on the middle of the pitch.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.