Join us  

IND vs ENG 3rd Test : "ध्यान रखना सर्फराज का", वडिलांच्या विनंतीला रोहित शर्माचं मन जिंकणारं उत्तर... 

India vs England 3rd Test Live update : भारतीय संघाने पहिल्या दिवशी वर्चस्व राखताना ५ बाद ३२६ धावांचा डोंगर उभा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 9:35 AM

Open in App

India vs England 3rd Test Live update Day 1 ( Marathi News ) : राजकोटचा लोकल बॉय रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मानंतर शतकी खेळी केली. भारतीय संघाने पहिल्या दिवशी वर्चस्व राखताना ५ बाद ३२६ धावांचा डोंगर उभा केला. राजकोट कसोटी ही भारतीयांना भावनिक करणारी ठरली. या कसोटीतून सर्फराज खान ( Sarfaraz Khan) या प्रतिभावान खेळाडूने पदार्पण केले. दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या हस्ते त्याला कसोटी पदार्पणाची ३११ क्रमांकाची कॅप दिली गेली. हा क्षण भावनिक केव्हा झाला, जेव्हा ती कॅप घेऊन सर्फराज वडील नौशाद खान यांच्याकडे धावला आणि त्यांना कडकडून मिठी मारली. मुलाच्या मेहनतीचं आज खऱ्या अर्थाने चीज झाल्याची भावना नौशाद यांच्या डोळ्यांतून तरळणाऱ्या अश्रूंतून व्यक्त होत होती. 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत. रणजी करंडक स्पर्धेच्या मागील दोन पर्वात त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या, परंतु त्याला भारतीय संघात स्थान का मिळत नाही, याने नौशाद थोडे व्यतिथ नक्की झाले होते. पण, त्यांनी मुलाला धीर सोडू नकोस, आपला खेळ खेळत राहा, असा सल्ला दिला. काल त्याचं फळ त्याला मिळालं..

सर्फराजने पहिल्या कसोटीत ६६ चेंडूंत ६२ धावांची आक्रमक खेळी केली. दुर्दैवाने तो रन आऊट झाला नसता तर त्याने आणखी धावा नक्कीच कुटल्या असत्या.

  • सर्फराजला कसोटी कॅप दिल्यानतंर जेव्हा कर्णधार रोहित शर्माने नौशाद यांची भेट घेतली तेव्हा ते त्याला म्हणाले, ध्यान रखना सर्फराज का.... 
  • त्यावर रोहित म्हणाला, बिलकूल बिलकूल... प्रत्येकाला माहित्येय की सर्फराजसाठी तुम्ही किती खस्ता खाल्ला आहे तो, तुम्ही किती त्याग केला आहे तो आणि त्याच्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली आहे... तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन...   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडऑफ द फिल्डसर्फराज खानरोहित शर्मा