India vs England 3rd Test Live Updates Day 3 ( Marathi News ) - बेन डकेटची मोठी विकेट मिळवल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. कुलदीप यादवने दोन महत्त्वाच्या विकेट मिळवून दिल्या. त्यानंतर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व मोहम्मद सिराज यांना यश मिळाले. स्टोक्सच्या विकेटसह रवींद्र जडेजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा टप्पा पार केला आणि घरच्या मैदानावरील ही त्याची २०० वी विकेट ठरली.
रोहित शर्माने Live मॅचमध्ये रवींद्र जडेजाला मारला 'टोमणा'; IPLचा दाखला देत चांगलं सुनावलं, Video
तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र भारतीय गोलंदाजांनी गाजवले. इंग्लंडच्या बेन डकेटने ( Ben Duckett ) १५३ धावांची आक्रमक खेळी करून भारताचे टेंशन वाढवले होते. पण, कुलदीप यादवने त्याला फिरकीच्या जाळ्यात ओढले आणि चतुराईने ही विकेट मिळवली. त्याआधी कुलदीपने जॉनी बेअरस्टोची ( ०) आणि जसप्रीत बुमराहने जो रुटची ( १८) विकेट घेतली. ४४५ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा निम्मा संघ २६० धावांत तंबूत परतला. आर अश्विनला कौटुंबिक कारणामुळे अचानक तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. देवदत्त पडिक्कल बदली खेळाडू म्हणून संघात खेळतोय. बेन डकेटने १५१ चंडूंत २३ चौकार व २ षटकारांसह १५३ धावांची विक्रमी खेळी केली. कुलदीपच्या गोलंदाजीवर डकेत झेलबाद झाला.
भारतात कसोटीत २०० विकेट्स घेणारा रवींद्र जडेजा भारताचा ५ वा गोलंदाज ठरला आहे. ३५० विकेट्स - अनिल कुंबळे ( ११५ इनिंग्ज)३४७ विकेट्स - आर अश्विन ( ११२)२६५ विकेट्स - हरभजन सिंग ( १०३) २१९ विकेट्स - कपिल देव ( ११९) २००* विकेट्स - रवींद्र जडेजा ( ८२ )