India vs England 3rd Test Live Updates Day 3 -आर अश्विनने ( Ravi Ashwin's replacement ) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे त्याला राजकोट कसोटी अर्धवट सोडून घरी परतावे लागले. राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने ५०० कसोटी बळी पूर्ण करून इतिहास रचला. यानंतर रात्री उशिरा त्याच्या या सामन्यातून बाहेर पडल्याची बातमी आली. कौटुंबिक कारणामुळे अश्विनने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतल्याचे बीसीसीआयने एक निवेदन जारी केले.
आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की, टीम इंडियाला सामन्याच्या मध्यात आर अश्विनची रिप्लेसमेंट खेळवता येईल का? रोहितला आता फक्त १० खेळाडूंसोबत खेळावे लागेल. राजकोट कसोटीत भारतीय संघ १० खेळाडूंसह खेळणार की पूर्ण ११ खेळाडूंसह, हे आता इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि इंग्लिश व्यवस्थापनाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, टीम इंडिया अश्विनच्या बदली प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही खेळाडूला समाविष्ट करू शकत नाही. नियमांनुसार, इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सच्या संमतीनंतरच भारतीय संघ आर अश्विनच्या जागी खेळाडू दुसरा खेळाडू आणू शकतो. एमसीसी नियम १.२.२ नुसार, प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही खेळाडूला विरोधी कर्णधाराच्या परवानगीशिवाय बदलता येत नाही.
जर स्टोक्सने टीम इंडियाला अश्विनची जागा घेण्यास परवानगी दिली तर कोणताही खेळाडू अश्विनची जागा घेऊ शकतो. अन्यथा भारतीय संघाला १० खेळाडू आणि एका पर्यायासह मैदानात उतरावे लागेल. नियमांनुसार, बदली खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही, तो फक्त क्षेत्ररक्षण करू शकतो. पण, भारतीय संघाने १० प्रमुख व १ राखीव खेळाडूंसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आर अश्विनची रिप्लेसमेंट झालेली नाही. देवदत्त पडिक्कल अश्विनला बदली खेळाडू ( Substitute) म्हणून संघात खेळतोय.
Web Title: India vs England 3rd Test Live Updates Day 3 - Devdutt Padikkal is the substitute fielder for Ravi Ashwin, Ravi Ashwin's replacement can be allowed for this 3rd Test Match but after consent of Ben Stokes.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.