ध्रुव जुरेलचा भन्नाट रन आऊट, रोहित शर्माची अफलातून कॅच; इंग्लंडची टीम संकटात, Video

२३ वर्षीय यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने पुन्हा एक द्विशतक झळकावून विक्रमांचा पाऊस पाडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 02:53 PM2024-02-18T14:53:27+5:302024-02-18T14:53:45+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test Live Updates Day 4 : Dhruv Jurel with an extraordinary run out & WHAT A CATCH BY CAPTAIN ROHIT SHARMA, ENGLAND 28 FOR 4, Video   | ध्रुव जुरेलचा भन्नाट रन आऊट, रोहित शर्माची अफलातून कॅच; इंग्लंडची टीम संकटात, Video

ध्रुव जुरेलचा भन्नाट रन आऊट, रोहित शर्माची अफलातून कॅच; इंग्लंडची टीम संकटात, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd Test Live Updates Day 4 ( Marathi News ) :  भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. २३ वर्षीय यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने पुन्हा एक द्विशतक झळकावून विक्रमांचा पाऊस पाडला. ब्रेंडन मॅक्युलम व बेन स्टोक्स यांच्या इंग्लंड संघाविरुद्ध प्रथमच कोणत्यातरी संघाने डाव घोषित केला आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाचे सर्वांनी कौतुक केले. ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कोंडी झाली आहे. यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने केलेला भन्नाट रन आऊट आणि रोहित शर्माच्या अफलातून झेलने पाहुण्यांना बॅकफूटवर फेकले आहे. 

यशस्वी भवः! सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर आता फक्त भारताचा युवा स्टार; पाहा भन्नाट स्टॅट्स 

इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर गुंडाळून भारताने १२६ धावांची आघाडी घेतली. त्यात दुसऱ्या डावात ४३० धावांची भर घालून भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य ठेवले. यशस्वी जैस्वालने २३६ चेंडूंत १४ चौकार व १२ षटकारांसह नाबाद २१४ धावा केल्या. शुबमन गिलने ९१ आणि सर्फराज खानने नाबाद ६८ धावा केल्या. रोहितने दुसरा डाव ४ बाद ४३० धावांवर घोषित केला.  एकाच कसोटी मालिकेत दोन द्विशतक झळकावणारा यशस्वी हा विनू मंकड व विनोद कांबळी यांच्यानंतरचा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. वयाच्या २२व्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५३ षटकार खेचून सुरेश रैनाचा ४९ षटकारांचा विक्रम मोडला.  


पहिल्या डावातील शतकवीर बेन डकेट ( ४) याला दुसऱ्या डावात ध्रुव जुरेलने चतुराई दाखवताना रन आऊट केले. जसप्रीत बुमराहने दुसरा सलामीवीर झॅक क्रॉलीला ( ११) पायचीत केले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर रोहितने स्लीपमध्ये ऑली पोपचा ( ३) अफलातून झेल घेतला. पाठोपाठ जडेजाने जॉनी बेअरस्टोला ( ४) पायचीत केले. इंग्लंडचे ४ फलंदाज २८ धावांत तंबूत परतले. आर अश्विन सामना खेळण्यासाठी पुन्हा परतला. बीसीसीआयने त्याला घरी जाण्यासाठी आणि पुन्हा राजकोटला येण्यासाठी चार्टड फ्लाईटची सोय केली होती. 
 

Web Title: India vs England 3rd Test Live Updates Day 4 : Dhruv Jurel with an extraordinary run out & WHAT A CATCH BY CAPTAIN ROHIT SHARMA, ENGLAND 28 FOR 4, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.