India vs England 3rd Test Live Updates Day 4 ( Marathi News ) : भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत विजय मिळवला. यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने पुन्हा एक द्विशतक झळकावले, शुबमन गिल ( ९१) व सर्फराज खान ( ६८ ) यांनी धावांचे योगदान दिले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल करताना इंग्लंडचे कंबरडे मोडले. पहिल्या डावातील शतकवीर रवींद्र जडेजा याने ५ विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ( संपूर्ण धावफलक एका क्लिकवर )
ध्रुव जुरेलचा भन्नाट रन आऊट, रोहित शर्माची अफलातून कॅच; इंग्लंडची टीम संकटात, Video
इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर गुंडाळून भारताने १२६ धावांची आघाडी घेतली. त्यात दुसऱ्या डावात ४३० धावांची भर घालून भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य ठेवले. यशस्वी जैस्वालने २३६ चेंडूंत १४ चौकार व १२ षटकारांसह नाबाद २१४ धावा केल्या. रोहितने दुसरा डाव ४ बाद ४३० धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील शतकवीर बेन डकेट ( ४) याला दुसऱ्या डावात ध्रुव जुरेलने चतुराई दाखवताना रन आऊट केले. जसप्रीत बुमराहने दुसरा सलामीवीर झॅक क्रॉलीला ( ११) पायचीत केले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर रोहितने स्लीपमध्ये ऑली पोपचा ( ३) अफलातून झेल घेतला. पाठोपाठ जडेजाने जॉनी बेअरस्टोला ( ४) पायचीत केले.
आर अश्विन सामना खेळण्यासाठी पुन्हा परतला. बीसीसीआयने त्याला घरी जाण्यासाठी आणि पुन्हा राजकोटला येण्यासाठी चार्टड फ्लाईटची सोय केली होती. बेन स्टोक्स व जो रूट ही अनुभवी जोडी मैदानावर काही काळ उभी राहिली होती. पण, जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रूट ( ७) पायचीत झाला. रिव्ह्यू घेऊनही काही उपयोग झाला नाही. त्यानंतर पुढच्याच षटकात कुलदीप यादवला स्वीप मारताना बेन स्टोक्स ( १५) पायचीत झाल्याने इंग्लंडची अवस्था ६ बाद ५० अशी दयनीय झाली. कुलदीपच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात रेहान अहमद भोपळ्यावर बाद झाला.