India vs England 3rd Test Live Updates Day 1 : रोहित शर्माने ( Rohit Sharma ) राजकोटटे मैदान गाजवले. त्याने रवींद्र जडेजासह चौथ्या विकेटसाठी विक्रमी २०४ धावांची भागीदारी केली. पदार्पणवीर सर्फराज खान मैदानावर येत असताना रोहितने त्याची पाठ थोपटली. सुरुवातीची काही षटकं सावध खेळून सेट झालेल्या सर्फराजने त्याचे हात मोकळे करून उत्तुंग फटके खेचले. रोहित बाद झाला तेव्हा जडेजा ८५ धावांवर होता आणि तो ९६ धावांपर्यंत पोहोचेपर्यंत सर्फराजने ४८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
Stats : शतकवीर रोहित शर्मा मैदान गाजवून माघारी, रवींद्र जडेजासह मोडला ३९ वर्षांपूर्वीचा विक्रम
इंग्लंडने ३ बाद ३३ अशी भारताची अवस्था केली असताना रोहित व रवींद्र जडेजा ही जोडी मैदानावर उभी राहिली. मार्क वूडने दोन धक्के दिल्यानंतर टॉम हार्टलीनेही १ विकेट घेतली. यशस्वी जैस्वाल ( १०), शुबमन गिल ( ०) व रजत पाटीदार ( ५) हे पहिल्या सत्रात माघारी परतले. रोहित व जडेजा या जोडीने इंग्लंडची डोकेदुखी वाढवली आहे. रोहितचा २७ धावांवर झेल सोडणे इंग्लंडला महागात पडले. हिटमॅनने कसोटीतील ११वे शतक झळकावले. मार्क वूडने ही जोडी तोडताना १९६ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १३१ धावा करणाऱ्या रोहितला बाद केले. पण, त्याने जडेजासह ३९ वर्ष जूना विक्रम मोडला.
सर्फराज खान व ध्रुव जुरेल हे दोन पदार्पणवीर पुढे फलंदाजीला येणार असल्याने रोहित व जडेजा या अनुभवी खेळाडूंचे मैदानावर उभे राहणे गरजेचे होते. या दोघांनी तेच केले. ३६ वर्ष व २९१ दिवसांचा असणारा रोहित हा कसोटीत शतक झळकावणारा भारताचा वयस्कर कर्णधार ठऱला. दुखापतीतून सावरून पुनरागमन करत जडेजानेही चांगली फटकेबाजी केली. रोहित व जडेजाची विक्रमी २०४ धावांची भागीदारी मार्क वूडने तोडली. रोहित १३१ धावांवर बाद झाल्यानंतर सर्फराजने स्फोटक फटकेबाजी केली. जडेजा ८५ वरून ९६ धावांपर्यंत पोहोचतोय, तोच सर्फराजने ४८ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि भारताकडून पदार्पणातील हे वेगवान अर्धशतक ठरले. भारताकडून सहाव्या किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना पदार्पणात पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा सर्फराज सातवा खेळाडू ठरला.
कसोटी पदार्पणात वेगवान अर्धशतक 42 - युवराज ऑफ़ पटियाला vs ENG, 193448 - हार्दिक पांड्या vs SL, 201748 - सर्फ़राज़ ख़ान vs ENG, 202450 - शिखर धवन vs AUS, 201356 - पृथ्वी शॉ vs WI, 2018