India vs England 3rd Test Live Updates Day 1 - रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांच्या शतकाने भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. पदार्पणवीर सर्फराज खान छोटा पॅकेट, बडा धमाका ठरला. सर्फराजला कसोटी पदार्पणाची कॅप मिळताच, त्याचे वडील नौशाद खान व पत्नी भावनिक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. सर्फराजने त्याचे पदार्पण सार्थ ठरवताना विक्रमी खेळी केली आणि भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले.
रवींद्र जडेजाची चूक, Sarfaraz Khan झाला रन आऊट; रोहित शर्माला राग अनावर अन्... Video
यशस्वी जैस्वाल ( १०), शुबमन गिल ( ०) व रजत पाटीदार ( ५) हे पहिल्या सत्रात माघारी परतले. रोहित व जडेजा या जोडीने इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. रोहित १९६ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १३१ धावांवर झेल बाद झाला. मार्क वूडची ही तिसरी विकेट ठरली आणि त्याने चतुराईने रोहितची विकेट मिळवली. त्यानंतर पदार्पणवीर सर्फराज मैदानावर आला. खान कुटुंबियांसाठी हा खूप भावनिक क्षण होता. सुरुवातीला सावध खेळ करणाऱ्या सर्फराजने ४८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि भारताकडून पदार्पणातील संयुक्तपणे ( हार्दिक पांड्या वि. श्रीलंका, २०१७) दुसरे वेगवान अर्धशतक ठरले.
सर्फराज चांगले फटके खेचताना दिसला, परंतु त्याला ६६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६२ धावांवर माघारी जावे लागले. तो रन आऊट झाला. सर्फराज व जडेजा यांनी ७७ धावांची भागीदारी केली. रवींद्रने शतक पूर्ण केले, परंतु सर्फराजच्या विकेटचे दडपण त्याच्यावर दिसले आणि त्याने शतकाचे फार सेलिब्रेशन नाही केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ५ बाद ३२६ धावा केल्या. जडेजा २१२ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ११० धावांवर नाबाद आहे, तर कुलदीप यादव १ धावांवर नाबाद राहिला.
Web Title: India Vs England 3rd Test match Day 1 Live Scorecard - Rohit Sharma - 131(196), Ravindra Jadeja - 110*(212), Sarfaraz Khan - 62(66), Indian team recovered from 33/3 to 326/5 during Day 1 stumps
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.