India vs England 3rd Test Live Updates Day 1 ( Marathi News ) : रोहित शर्माने ( Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधील ११वे शतक आज राजकोट येथे झळकावले. इंग्लंडने ३ बाद ३३ अशी भारताची अवस्था केली असताना रोहित व रवींद्र जडेजा ही जोडी मैदानावर उभी राहिली. या दोघांनी १५० हून अधिक धावांची भागीदारी करताना इंग्लंडची झोप उडवली. रोहितने १६७ चेंडूंत नाबाद १०६ धावांची खेळी करताना ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
रोहित शर्मा 'हिट'! सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडले, सौरव गांगुलीलाही मागे सोडले
मार्क वूडने दोन धक्के दिल्यानंतर टॉम हार्टलीनेही १ विकेट घेतली आणि भारताची अवस्था ३ बाद ३३ अशी दयनीय केली होती. यशस्वी जैस्वाल ( १०)व शुबमन गिल ( ०) यांना वूडूने माघारी पाठवले. टॉम हार्टलीने सप्राईज चेंडू टाकून रजत पाटीदार ( ५) ला बाद केले. पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिल्यानंतर रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरला. या जोडीने इंग्लंडची डोकेदुखी वाढवली आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणले. रोहितने आजच्या खेळीत अनेक विक्रम मोडले. रोहितचा २७ धावांवर झेल सोडणे इंग्लंडला महागात पडले. हिटमॅनने कसोटीतील ११वे शतक झळकावले.
सर्फराज खान व ध्रुव जुरेल हे दोन पदार्पणवीर पुढे फलंदाजीला येणार असल्याने रोहित व जडेजा या अनुभवी खेळाडूंचे मैदानावर उभे राहणे गरजेचे होते. या दोघांनी तेच केले आणि दीडशतकी भागीदारी पूर्ण करून इंग्लंडला झोडले.
- राजकोटमध्ये कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा तिसरा आणि एकूण चौथा सलामीवीर ठरला. पृथ्वी शॉ ( १३४ वि. वेस्ट इंडिज, २०१८), एलिस्टर कूक ( १३० वि. भारत, २०१६) व मुरली विजय ( १२६ वि. इंग्लंड, २०१६) यांनी इथे शतक झळकावले होते.
- सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे ४२वे शतक ठरले आणि त्याने ( ३३९) ख्रिस गेल ( ५०६) पेक्षा कमी इनिंग्जमध्ये हा पल्ला गाठला. सनथ जयसूर्याचा ४१ शतकांचा विक्रम मोडला.
- ३६ वर्ष व २९१ दिवसांचा असणारा रोहित हा कसोटीत शतक झळकावणारा भारताचा वयस्कर कर्णधार ठऱला. यापूर्वी हा विक्रम विजय हजारे ( ३६ वर्ष व २७८ दिवस) यांच्या नावांवर होता. १९५१ मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. ट्वेंटी-२० व वन डे क्रिकेटमध्येही हा विक्रम रोहितच्या नावावर आहे.
Web Title: India Vs England 3rd Test match Day 1 Live Scorecard - Rohit Sharma ( 36y 291d) became a Oldest Indian Captain to score Century in Test, he break 73yr old Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.