Join us  

रोहित शर्मा 'हिट'! सचिन तेंडुलकरचे दोन विक्रम मोडले, सौरव गांगुलीलाही मागे सोडले

रोहित शर्मा व रवींद्र जडेजा या जोडीने इंग्लंडची डोकेदुखी वाढवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 1:14 PM

Open in App

India vs England 3rd Test Live Updates Day 1 ( Marathi News ) :  रोहित शर्मा व रवींद्र जडेजा या जोडीने इंग्लंडची डोकेदुखी वाढवली आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणले आहे. रोहितची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, तर जडेजाही अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे. रोहितने आजच्या खेळीत अनेक विक्रम मोडले. 

मार्क वूडने दोन धक्के दिल्यानंतर टॉम हार्टलीनेही १ विकेट घेतली आणि भारताची अवस्था ३ बाद ३३ अशी दयनीय केली होती.  यशस्वी जैस्वाल ( १०)व शुबमन गिल ( ०) यांना वूडूने माघारी पाठवले. टॉम हार्टलीने सप्राईज चेंडू टाकून रजत पाटीदार ( ५) ला बाद केले. पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिल्यानंतर रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरला. रवींद्र जडेजाला पुढच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले आणि त्याने रोहितसह भारताचा डाव सावरला. रोहितने ७१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताने पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ३ बाद ९३ धावा केल्या होत्या.

  • रोहितने इंग्लंडविरुद्ध २००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर ( ३९९०) व विराट कोहली ( ३९७०) हे या विक्रमात पहिल्या दोन क्रमांकावर आहेत. महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग व दिलिप वेंगसरकर हे रोहितच्या पुढे आहेत.
  • रोहितने ४ संघांविरुद्ध प्रत्येकी २००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि सुनील गावस्कर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग यांच्याशी बरोबरी केली. सचिन ( ८), राहुल द्रविड ( ७) व विराट कोहली ( ६) हे आघाडीवर आहेत. कर्णधार म्हणून भारताकडून रोहितने ४५२७* धावा करून सचिनला ( ४५०८) मागे टाकले.
  •  भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. त्याने आज १८५७७ धावांचा टप्पा पार करून सौरव गांगुलीला ( १८५७५) मागे टाकले. सचिन ( ३४३५७), विराट ( २६७३३), राहुल ( २४२०८) हे रोहितच्या पुढे आहेत.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मासचिन तेंडुलकरसौरभ गांगुली