Join us  

कष्टाचे फळ! लेकाला कसोटी कॅप मिळाली अन् 'बाप' सर्वांसमोर ढसाढसा रडला; भारतीय संघात ४ बदल

India vs England 3rd Test Live Updates Day 1 : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीत भारताकडून दोन खेळाडूंनी आज पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 8:58 AM

Open in App

India vs England 3rd Test Live Updates Day 1 : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीत भारताकडून दोन खेळाडूंनी आज पदार्पण केले. लोकेश राहुलच्या माघारीमुळे एक जागा रिक्त झालीच होती, त्यात यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरत याला बसवले गेले. ध्रुव जुरेल व सर्फराज खान ( Sarfaraz Khan) यांचे आज पदार्पण झाले. सर्फराजला कसोटी कॅप मिळालेली पाहून वडील नौशाद खान खूप भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. 

रजत पाटीदारला दुसऱ्या कसोटीत संधी दिली गेली होती, परंतु त्याला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत यालाही आतापर्यंत संधीचं सोनं करता आलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत युवा यष्टिरक्षक ध्रुव जुरेल याला संधी मिळेल अशी चर्चा होती. सराव सत्रात यष्टींमागे जुरेल दिसला, पहिल्या व दुसऱ्या स्लीपमध्ये सर्फराज खान व यशस्वी जैस्वाल होते, तर गलीमध्ये रजत उभा होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात सर्फराज व जुलेर यांचे पदार्पण पक्के झालेच होते. रजतला आणखी एका सामन्यात संधी दिली गेली. अनिल कुंबळेच्या हस्ते आज सर्फरालजा कसोटी पदार्पणाची कॅप दिली गेली, तेव्हा शेजारीच उपस्थित असलेले त्याचे वडील ढसाढसा रडले. दिनेश कार्तिकने जुरेलला कसोटी कॅप दिली. 

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. सर्फराज व जुरेल यांचे पदार्पण झाले आहेत. जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहे. मुकेश कुमार व अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. 

भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आऱ अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज

इंग्लंडचा संघ - ( England Men's XI ) - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड व जेम्स अँडरसन.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसर्फराज खान