India vs England 3rd Test Live Updates Day 1 ( Marathi News ) : तिसऱ्या कसोटीचे पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिले. मार्क वूडने दोन धक्के दिल्यानंतर टॉम हार्टलीनेही १ विकेट घेतली आणि भारताची अवस्था ३ बाद ३३ अशी दयनीय केली होती. पण, कर्णधार रोहित शर्मा व रवींद्र जडेजा ही जोडी खेळपट्टीवर उभी राहिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५०+ धावांची भागीदारी करून संघाला शतकापार नेले आहे. भारताच्या फलंदाजांसाठी इंग्लंडने चांगले डावपेच आखले होते आणि त्यातलाच एक असा की पुल शॉट मारणाऱ्या रोहितला बाद करण्यासाठी डाव्या बाजूला ४ क्षेत्ररक्षक उभे केले होते आणि गोलंदाज बाऊन्सरचा मारा करत होते. असाच एक बाऊन्सर रोहितच्या हेल्मेटच्या जाळीवर आदळला अन्...
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात ४ बदलासह भारतीय संघ मैदानावर उतरला. सर्फराज खान व ध्रुव जुरेल यांचे पदार्पण झाले,तर मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहे. मार्क वूडने सुरुवातीच्या षटकांत यशस्वी जैस्वाल ( १०) व शुबमन गिल ( ०) यांना माघारी पाठवले. रजत पाटीदार ( ५) याने पुन्हा संधी गमावली आणि टॉम हार्टलीला विकेट दिली. भारताने ३३ धावांत ३ विकेट्स गमावल्या. रोहितला रोखण्यासाठी कर्णधार बेन स्टोक्सने डाव्या बाजूला ४ खेळाडू उभे केले होते आणि गोलंदाज त्याला बाऊन्सर टाकून पूल मारण्यास प्रोत्साहित करताना दिसले.
रवींद्र जडेजाला पुढच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले आणि त्याने रोहितसह भारताचा डाव सावरला. रोहितने ७१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. भारताने पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ३ बाद ९३ धावा केल्या.
Web Title: India Vs England 3rd Test match Day 1 Live Scorecard - Scary bouncer; Rohit Sharma HIT By NASTY Bouncer Off Mark Wood, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.