India vs England 3rd Test Live Updates Day 1 ( Marathi News ) : तिसऱ्या कसोटीचे पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिले. मार्क वूडने दोन धक्के दिल्यानंतर टॉम हार्टलीनेही १ विकेट घेतली आणि भारताची अवस्था ३ बाद ३३ अशी दयनीय केली होती. पण, कर्णधार रोहित शर्मा व रवींद्र जडेजा ही जोडी खेळपट्टीवर उभी राहिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५०+ धावांची भागीदारी करून संघाला शतकापार नेले आहे. भारताच्या फलंदाजांसाठी इंग्लंडने चांगले डावपेच आखले होते आणि त्यातलाच एक असा की पुल शॉट मारणाऱ्या रोहितला बाद करण्यासाठी डाव्या बाजूला ४ क्षेत्ररक्षक उभे केले होते आणि गोलंदाज बाऊन्सरचा मारा करत होते. असाच एक बाऊन्सर रोहितच्या हेल्मेटच्या जाळीवर आदळला अन्...
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात ४ बदलासह भारतीय संघ मैदानावर उतरला. सर्फराज खान व ध्रुव जुरेल यांचे पदार्पण झाले,तर मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहे. मार्क वूडने सुरुवातीच्या षटकांत यशस्वी जैस्वाल ( १०) व शुबमन गिल ( ०) यांना माघारी पाठवले. रजत पाटीदार ( ५) याने पुन्हा संधी गमावली आणि टॉम हार्टलीला विकेट दिली. भारताने ३३ धावांत ३ विकेट्स गमावल्या. रोहितला रोखण्यासाठी कर्णधार बेन स्टोक्सने डाव्या बाजूला ४ खेळाडू उभे केले होते आणि गोलंदाज त्याला बाऊन्सर टाकून पूल मारण्यास प्रोत्साहित करताना दिसले.