नॉटींगहम : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या भेदक गोलंदाजीने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी धमाकाच केला. पंड्याने वेगवान गोलंदाजी करत इंग्लंडच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले आणि त्यांचा 161 धावांत खुर्दा उडवला.
हार्दिक पंड्या आणि त्याला अन्य गोलंदाजांनी सुरेख साथ दिल्यामुळे भारताला इंग्लंडच्या पहिल्या डावाला खीळ बसवता आली. भारताच्या 329 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशकत झळकावता आले नाही.
इंग्लंडच्या सलामीवीरांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. इंग्लंडने 54 धावांपर्यंत एकही बळी गमावला नव्हता. पण त्यानंतर त्यांचा डाव घसरायला सुरुवात झाली. पंड्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला लोकेश राहुलकरवी झेलबाद केले आणि त्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडायला सुरुवात झाली. पंड्याने रूटला बाद केल्यानंतर टिच्चून मारा केल्या. त्यामुळे इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहता आले नाही.