India vs England 3rd Test : अक्षर पटेलनं ( Axar Patel) दिलेल्या दणक्यानंतर इंग्लंडच्या संघाला रोहित शर्मानं ( Rohit Sharma) चोपून काढलं. फिरकी गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर तीन जलदगती गोलंदाज खेळवण्याची चूक इंग्लंडला पहिल्याच दिवशी महागात पडल्याचे दिसले. अक्षर पटेल आणि आर अश्विन ( R Ashwin) यांनी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गुंडाळला आणि प्रत्युत्तरात भारतानं पहिल्या दिवसअखेर ३ बाद ९९ धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाचा डाव सावरला. जो रुट बाद होताच विराट कोहलीनं केलं भन्नाट सेलिब्रेशन; सोशल मीडियावर Video Viral
शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा झटपट माघारी परतल्यानंतर रोहितनं कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहितनं घरच्या मैदानावर ६००० आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या आणि असा पराक्रम करणारा तो ९वा भारतीय फलंदाज ठरला. रोहितनं कसोटीत सलामीवीर म्हणून सहाव्यांदा ५०+ धावा केल्या. विराट कोहलीला जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर जीवदान मिळालं. पण, जॅक लिचनं त्याला २७ धावांवर माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. Ind vs Eng Pink Ball Test बेन स्टोक्सनं असं केलं तरी काय, की विराट कोहलीला अनावर झाला राग; सुनील गावस्करांनी टोचले कान