India vs England 3rd Test : लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या चार खेळाडूंवर टांगती तलवार, विराट कोहली घेणार मोठा निर्णय!

india vs England 2021 3rd test match live cricket score : इंग्लंडनं तिसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गावजताना १ डाव व ७६ धावांनी विजय मिळवून टीम इंडियाविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 07:19 PM2021-08-28T19:19:49+5:302021-08-28T19:27:24+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test : Virat Kohli said "We will have conversation about the rotation, we can't expect everyone to play 4 continues Test matches in a long tour | India vs England 3rd Test : लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या चार खेळाडूंवर टांगती तलवार, विराट कोहली घेणार मोठा निर्णय!

India vs England 3rd Test : लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या चार खेळाडूंवर टांगती तलवार, विराट कोहली घेणार मोठा निर्णय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअजिंक्य रहाणेला विश्रांती देण्याची वेळ आलीय, विनोद कांबळीनं मांडलं स्पष्ट मत

india vs England 2021 3rd test match live cricket score : इंग्लंडनं तिसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गावजताना १ डाव व ७६ धावांनी विजय मिळवून टीम इंडियाविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. इंग्लंडच्या या पलटवारानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे. सामन्यानंतर त्यानं फलंदाजांचे कान टोचले अन् त्याचा रोख चौथ्या कसोटीत काही बदलांकडे आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आम्ही संघातील रोटेशन पॉलिसीबद्दल बोललो, अशात दीर्घ दौऱ्यावर प्रत्येकाला चार सामने खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा नाही करू शकत, असे मत विराटनं व्यक्त केलं. ( Virat Kohli said "We will have conversation about the rotation, we can't expect everyone to play 4 continues Test matches in a long tour)

टीम इंडियाचा पराभव करून इंग्लंडनं केली पाकिस्तानची मदत; बाबर आजमच्या संघाला मोठा फायदा1

इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळला. कर्णधार जो रूटनं सलग तिसरं शतक झळकावून टीम इंडियाचा बॅक सिटवर ढकलले. ३५४ धावांची पिछाडी भरून इंग्लंडसमोर लक्ष्य ठेवणे अशक्यच होते, तरीही भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात संघर्ष दाखवला. रोहित शर्मा ( ५९) व चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाच्या चाहत्यांना आशेचा किरण दाखवला. पुजारा व कर्णधार विराट कोहली या जोडीनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत खिंड लवढून दिलासादायक कामगिरी केली. चौथ्या दिवशी पुजाराला एकही धावेची भर न घातला ९१ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर विराटही ५५ धावांवर बाद झाला अन् २ बाद २१५ धावांवरून टीम इंडियाची घसरगुंडी सुरू झाली. भारताचे ८ फलंदाज ६३ धावांवर माघारी परतले. भारताचा दुसरा डाव २७८ धावांवर गडगडला.

जेवढं लढू शकत होतो, तेवढं लढलो, पण...; विराट कोहलीनं पराभवाचं खरं कारण सागितलं!
 


या सामन्यानंतर विराटनं २ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत बदलाचे संकेत दिले. त्यानुसार अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, इशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांच्यावर टांगती तलवार आहे. लोकेश राहुलला यष्टिंमागे उभे करून मयांक अग्रवालला मधल्या फळीत खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो. अजिंक्यच्याजागी सूर्यकुमार यादवला, इशांतच्या जागी शार्दूल ठाकूरला आणि रवींद्रच्या जागी आर अश्विन किंवा हनुमा विहारी यांचा विचार होऊ शकतो..

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी यानंही अजिंक्य रहाणेला विश्रांती देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे

 

Web Title: India vs England 3rd Test : Virat Kohli said "We will have conversation about the rotation, we can't expect everyone to play 4 continues Test matches in a long tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.