Join us  

India vs England 4th test Live : टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण, शमी व शर्मा बाकावर; इंग्लंडच्या पारड्यात नाणेफेकीचा कौल

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates :  भारत-इंग्लंड कसोटी मालिका खऱ्या अर्थानं रंगतदार अवस्थेत आला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 3:05 PM

Open in App

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates :  भारत-इंग्लंड कसोटी मालिका खऱ्या अर्थानं रंगतदार अवस्थेत आला आहे. इंग्लंडनं तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत बाजी मारून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. चौथ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळतील, असे संकेत कर्णधार विराट कोहलीनं दिले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात नेमके काय बदल होतात, याची सर्वांना उत्सुकता आहे. इंग्लंडच्याही संघात बदल पाहायला मिळाले. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. india vs england 4th test, india vs england 4th test live

तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती आणि सामना संपल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये दुखापतीचे स्कॅनसाठी गेला. पण, तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांनी कालच स्पष्ट केले. त्यामुळे विराट त्याला आणखी एक संधी देणार का, याचीही उत्सुकता होती. मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांना दुखापतीमुळे या सामन्यात मुकावे लागले असून शार्दूल ठाकूर व उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard

इंग्लंडचा संघात ऑली पोप व क्रिस वोक्स यांचे पुनरागमन झाले आहे. जोस बटलर व सॅम कुरन यांना विश्रांती देण्यात आले आहेत. ( Ollie Pope in for Jos Buttler and Chris Woakes in for Sam Curran are the changes for England.) 

भारताचा संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज ( #TeamIndia (Playing XI): Rohit Sharma, KL Rahul, Cheteshwar Pujara, Virat Kohli(c), Ajinkya Rahane, Rishabh Pant(w), Ravindra Jadeja, Shardul Thakur, Umesh Yadav, Jasprit Bumrah, Mohammed Siraj)

इंग्लंडचा संघ - रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेवीड मलान, जो रूट, ऑली पोप, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हर्टन, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन ( England (Playing XI): Rory Burns, Haseeb Hameed, Dawid Malan, Joe Root(c), Ollie Pope, Jonny Bairstow(w), Moeen Ali, Chris Woakes, Craig Overton, Ollie Robinson, James Anderson) 

५० वर्षांपूर्वी मिळवला होता विजय!भारतीय संघाचा ओव्हलवरील इतिहास फार चांगला नाही. १९७१ मध्ये भारतानं येथे एकमेव विजय मिळवला आहे. भारतानं १३ सामन्यांत पाच सामने गमावले आहेत आणि सात अनिर्णित निकाल लागले आहेत. २००७, २०१४ व २०१८ या मागिल तीनही मालिकांमधील ओव्हलवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. india vs england 4th test live udates, ind vs eng live test match

१९७१ च्या सामन्यात अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली ओव्हलवर पराक्रम घडला होता. इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना अॅलन क्नॉट ( ९०), जॉन जेमसन ( ८२) व रिचर्ड हटन ( ८१) यांच्या दमदार खेळाच्या जोरावर ३५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला दिलीप सरदेसाई ( ५४) व फारूख इंजिनियर ( ५९) यांची अर्धशतकं व अजिक वाडेकर (  ४८) व एकनाथ सोलकर ( ४४) यांच्या खेळीनं टीम इंडियाला सावरले. भागवत चंद्रशेखर यांनी ३८ धावांत ६ विकेट्स घेत इंग्लंडचा दुसरा डाव १०१ धावांवर गुंडाळला. भारतानं १७४ धावांचे लक्ष्य ६ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. वाडेकर ( ४५), सरदेसाई ( ४०), गुंडप्पा विश्वनाथ ( ३३) व फारूख इंजिनियर ( २८) यांनी दमदार खेळ केला.  ind vs eng live score, ind vs eng live score

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडमोहम्मद शामीइशांत शर्मा
Open in App