लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : भारताचा संघात सर्वात अनुभवी गोलंदाज आहे तो इशांत शर्मा. पण गेल्या काही दौऱ्यांमध्ये इशांतकडून चांगली होत नव्हती. पण इंग्लंडच्या दौऱ्यात मात्र त्याच्याकडून चांगली लौकिकाला साजेशी कामगिरी होत आहे. या दमदार कामगिरीच्या मागे एका माजी महान गोलंदाजाचा हात असल्याचे म्हटले जात होते. पण बीसीसीआयने आज इशांत आणि त्या महान गोलंदाजांचा एकत्र फोटो पोस्ट केला आहे.
इशांतच्या गोलंदाजीमध्ये झालेला सकारात्मक बदल हा वेस्ट इंडिजचे माजी महान गोलंदाज मायकल होल्डिंग यांच्यामुळे झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गोलंदाजी करताना आपली अॅक्शन कशी असावी. आपला हात आणि देहबोली कशी असावी, याबद्दल होल्डिंग यांनी इशांतला सल्ले दिले असल्याचे समजते.
बीसीसीआयने पोस्ट केलेला फोटो पाहा
क्रिकेट जगतामध्ये सर्वात सुंदर गोलंदाजीची अॅक्शन ही होल्डिंग यांची आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्याची सुवर्णसंधी इशांतला मिळाल्याचे म्हटले जात आहे. होल्डिंग यांनी समालोचन झाल्यावर इशांतला काही टिप्स दिल्या आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी इशांतच्या पथ्यावर पडल्या असे म्हटले जात आहे.