साऊदम्टन : भारतीय संघाला चौथ्या कसोटीत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २४५ धावांचा पाठलाग करताना भारतीय खेळाडू १८४ धावांत तंबूत परतले. या विजयाबरोबर इंग्लंडने 3-1 अशी मालिकाही खिशात घातली.
दुसऱ्या डावात विराट कोहली वगळता सर्व भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर नांगी टाकली. विराट कोहलीने 58 रन बनविले. तर रहाणेनेही 51 रन बनवत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय संघाने 19 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत केवळ 61 रन्स बनविले.
इंग्लंडच्या भूमीवर भारतीय संघाला गेल्या 10 वर्षांपासून मालिका विजय मिळविता आलेला नाही. शेवटचा मालिका विजय 2007 मध्ये 1-0 असा मिळाला होता.
विराटच्या नावावर आणखी एक विक्रमभारताचा कर्णधार विराट कोहली कर्णधार म्हणून सर्वात वेगवान 4 हजार रन बनविणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विराटने हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 65 डाव खेळले आहेत. तर ब्रायन लाराला 71 डाव खेळावे लागले होते.