India vs England 4th Test ( Marathi News ) : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथी कसोटी २३ फेब्रुवारीलापासून रांची येथे खेळवली जाणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघात बदल करण्यात आल्याची घोषणा BCCI ने केली आहे. प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला चौथ्या कसोटीपूर्वी रिलीज केले गेले आहे. मालिकेचा दीर्घ कालावधी लक्षात घेऊन आणि वर्क लोड पाहता, जसप्रीतला विश्रांती दिली गेली आहे.
दरम्यान, प्रमुख फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) याला चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. हैदराबाद कसोटीत लोकेशला दुखापत झाली होती आणि त्याला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते. तो तिसऱ्या कसोटीत खेळेले अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु तंदुरुस्तीच्या कारणास्तव त्याला वगळले गेले. आता चौथ्या कसोटीतही त्याचे पुनरागमन अशक्य झाले आहे. धर्मशाला येथे होणाऱ्या पाचव्या कसोटीतील त्याचा सहभाग हा तंदुरूस्तीवर अवलंबून असणार आहे.
मुकेश कुमार ज्याला तिसऱ्या कसोटीतून रिलीज केले गेले होते, तो रणजी करंडक स्पर्धेतील सामना खेळून पुन्हा रांची येथे टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप ( India’s updated squad for the 4th Test: Rohit Sharma (C), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Rajat Patidar, Sarfaraz Khan, Dhruv Jurel (WK), KS Bharat (WK), Devdutt Padikkal, R Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Akash Deep.)