Join us  

India vs England 4th test Live : सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडणाऱ्या जेम्स अँडरसनचं 'समर्पण' पाहा; Photo Viral 

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : विराट कोहलीनं ( Virat Kohi) मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना टीम इंडियाचा डाव सावरला. पण, पुन्हा एकदा त्याची ही गाडी शतकापर्यंत पोहोचू शकली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 7:44 PM

Open in App

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : विराट कोहलीनं ( Virat Kohi) मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना टीम इंडियाचा डाव सावरला. पण, पुन्हा एकदा त्याची ही गाडी शतकापर्यंत पोहोचू शकली नाही. ऑली रॉबिन्सननं अप्रतिम चेंडू टाकून त्याला बाद केले. पण, या सामन्यात विराटच्या अर्धशतकासह इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन ( James Anderson) याचंही कौतुक होत आहे. गुडघ्यातून रक्त वाहत असतानाही तो इंग्लंडला विराटची विकेट मिळवून देण्यासाठी गोलंदाजी करत होता. त्याला भले विराटची विकेट मिळाली नसली तरी त्याच्या समर्पणाचे सारेच कौतुक करत आहेत. india vs england 4th test, india vs england 4th test live

आर अश्विनला संधी न मिळाल्यानं पत्नीनं व्यक्त केली नाराजी, ट्विट व्हायरल!

या सामन्यात जेम्स अँडरसननं महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडला. अँडरसन कारकिर्दीतील १६६वा कसोटी सामना खेळत आहे, परंतु हा घरच्या मैदानावरील त्याचा ९५वा सामना आहे. घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या ( ९४) नावावर होता. तो अँडरसननं मोडला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ९२ कसोटीसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.  india vs england 4th test scorecard, india vs england 4th test live udates इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी संयमी सुरुवात केली.  पण, रोहित ११ व लोकेश १७ धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ११ धावांची भागीदारी जेम्स अँडरसननं तोडली. पुजारा ४ धावांवर माघारी परतला.  vs eng live test match, ind vs eng live score, ind vs eng live score

पुजारा बाद होताच पाचव्या क्रमांकावर टीम व्यवस्थापनानं रवींद्र जडेजाला पाठवले. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्काच होता.  वोक्सनं रुटकरवी रवींद्र जडेजाला ( १०) माघारी पाठवले. विराट व अजिंक्य दोघंही खेळपट्टीवर चिकटले. वोक्सनं अजिंक्यसाठी पायचीतची अपील केली अन् मैदानावरील पंचांनी त्याला बादही दिले. पण, विराटच्या सांगण्यावरून अजिंक्यनं DRS घेतला आणि त्याला जीवदान मिळाले. विराटनं ८५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मालिकेतील त्याचे हे दुसरे व इंग्लंडविरुद्धची सातवी ५०+ धावांची खेळी ठरली. विराटनं यासह महेंद्रसिंग धोनीचा ( ६) विक्र मोडला.(Most 50+ scores by Indian captain in Tests in England)   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजेम्स अँडरसनविराट कोहली
Open in App