India vs England 4th test Live : इंग्लंडच्या ताफ्यात चार डावखुरे फलंदाज, त्यामुळे रवींद्र जडेजा संघात - विराट कोहली

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 04:30 PM2021-09-02T16:30:04+5:302021-09-02T16:30:49+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th test live : England has four left-handers, so a good match-up for Ravindra Jadeja, Say Virat Kohli  | India vs England 4th test Live : इंग्लंडच्या ताफ्यात चार डावखुरे फलंदाज, त्यामुळे रवींद्र जडेजा संघात - विराट कोहली

India vs England 4th test Live : इंग्लंडच्या ताफ्यात चार डावखुरे फलंदाज, त्यामुळे रवींद्र जडेजा संघात - विराट कोहली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरवींद्र जडेजाला मागील तीन कसोटींत फक्त २ विकेट्स घेता आल्या आहेत. तरीही विराट कोहलीनं चौथ्या कसोटीत त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. गोलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीचे करण्याचे आव्हान टीम इंडियानं स्वीकारलं अन् लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी संयमी सुरुवातही केली, परंतु आजच्या सामन्यातून इंग्लंडच्या ताफ्यात कमबॅक करणाऱ्या ख्रिस वोक्सनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. पण, सलग चौथ्या कसोटी सामन्यात आर अश्विनला ( R Ashwin) बाकावर बसवल्यामुळे नेटकरी संतापले. त्यावर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) त्याचे मत मांडले. 

India vs England 4th test Live : भारतीय खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले; नेमकं घडलं तरी काय?


 तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती आणि सामना संपल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये दुखापतीचे स्कॅनसाठी गेला. पण, तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांनी कालच स्पष्ट केले होते. विराटनं त्याला पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांना दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले. त्यांच्या जागी उमेश यादव व शार्दूल ठाकूर यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली. आर अश्विन हाही सामना पेव्हेलियनमध्ये बसूनच पाहणार आहे. इंग्लंडच्या संघात ऑली पोप व क्रिस वोक्स यांचे पुनरागमन झाले आहे. जोस बटलर व सॅम कुरन यांना विश्रांती देण्यात आले आहेत.   india vs england 4th test, india vs england 4th test live

अश्विन संघात का नाही?
नाणेफेकीनंतर विराट कोहली म्हणाला,''आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायला आवडली असती. आजच्या संघात दोन बदल केले आहेत आणि अश्विनला अजूनही संधी नाही. इंग्लंडकडे चार डावखुरे फलंदाज आहेत आणि त्यांच्यासाठी रवींद्र जडेजा संघात आहे. त्याच्या मदतीला चार जलदगती गोलंदाज आहेत. शिवाय ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा फॅक्टरही महत्त्वाचा आहेच. आमचे सलामीवीर चांगली कामगिरी करत आहेत.'' 
    

भारताचा संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज 

इंग्लंडचा संघ - रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेवीड मलान, जो रूट, ऑली पोप, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हर्टन, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन  
 

Web Title: India vs England 4th test live : England has four left-handers, so a good match-up for Ravindra Jadeja, Say Virat Kohli 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.