Join us  

India vs England 4th test Live : ओली पोपच्या खेळीनं जागवल्या इंग्लंडच्या 'होप'; टीम इंडियानं गमावली वर्चस्वाची संधी!

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : ५ फलंदाज ६२ धावांवर माघारी परतूनही इंग्लंडनं चौथ्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 9:44 PM

Open in App

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : ५ फलंदाज ६२ धावांवर माघारी परतूनही इंग्लंडनं चौथ्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळवलं. उमेश यादवनं टीम इंडियाला सामन्यावर पकड मिळवून दिली होती, परंतु ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांनी ती पकड सैल केली. या दोघांच्या ८९ धावांच्या भागीदारीनं इंग्लंडनं आघाडीच्या दिशेनं वाटचाल केली. बेअरस्टो बाद झाला, परंतु पोपला अष्टपैलू मोईन अलीची साथ मिळाली. पोपच्या दमदार खेळीनं पहिल्या डावात इंग्लंडला दिलेल्या 'होप'मुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. त्यात संघात कमबॅक करणाऱ्या ख्रिस वोक्सनं गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही तुफान फटकेबाजी केली. 

आयपीएल २०२२ होणार आणखी रंगतदार; जाणून घ्या नवीन नियम व फॉरमॅट!

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात उमेश यादवनं दोन विकेट्स घेतल्या. पहिले त्यानं क्रेग ओव्हर्टनला ( १) बाद केले आणि त्यानंतर डेवीड मलानचा ( ३१) अडथळा दूर केला. ऑली पोप व जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी करताना इंग्लंडला शतकी पल्ला ओलांडून दिला. लंच ब्रेकनंतर मोहम्मद सिराजनं ही डोईजड झालेली जोडी तोडली. पोप व बेअरस्टो यांनी सहाव्या विकेटसाठी १३९ चेंडूंत ८९ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो ३७ धावांवर सिराजच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. india vs england 4th test, india vs england 4th test live

बेअरस्टो बाद झाला तेव्हा इंग्लंडचा संघ ४० धावांनी पिछाडीवर होता. पोप व अलीनं त्यानंतर सूत्र हाती घेतली. पोपनं अर्धशतक पूर्ण करताना अलीसोबत अर्धशतकी भागीदारीही केली. या दोघांच्या या भागीदारीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी घेता आली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर अली पायचीत होता, पण टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला त्यासाठी अपील करण्याची गरज भासली नाही. सुरुवातीला चेंडू अलीच्या पायावर आदळण्यापूर्वी बॅटला लागल्याचा अंदाज खेळाडूंना होता, परंतु रिप्लेत चेंडू थेट अलीच्या पायाला लागला अन् तो चेंडू यष्टींवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. पण, अलीला ( ३७ धावा) त्याचा फायदा उचलता आला नाही. रवींद्र जडेजानं त्याला बाद केले. अली व पोप यांची ७१ धावांची भागीदारी त्यानं संपुष्टात आणली. india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard

शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संघासाठी देवासारखा धावला. त्याच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात पोप त्रिफळाचीत झाला. त्यानं १५९ चेंडूंत ८१ धावा काढल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव गुंडाळण्यात भारताला थोडे कष्ट घ्यावे लागले. ख्रिस वोक्सनं फटकेबाजी केली. वोक्सनं ५८ चेंडूंत ११ चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. पण, एक धाव काढण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. ५ बाद ६२ धावांवरून इंग्लंडनं २९० धावांची मजल मारून पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली. india vs england 4th test live udates, ind vs eng live test match

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशार्दुल ठाकूरविराट कोहली
Open in App