Join us  

India vs England 4th test Live : भारतीय खेळाडूंनी बांधल्या हातावर काळ्या फिती; जाणून घ्या त्यामागचं कारण!  

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 3:57 PM

Open in App
ठळक मुद्देमोहम्मद शमी व इशांत शर्मा यांना दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले. त्यांच्या जागी उमेश यादव व शार्दूल ठाकूर यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली.

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. गोलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीचे करण्याचे आव्हान टीम इंडियानं स्वीकारलं अन् लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी संयमी सुरुवातही केली आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंच्या हातावर काळी पट्टी बांधलेली पाहायला मिळाली. त्यामुळे चाहते चिंतीत झाले आहेत. कोणाला आदरांजली वाहण्यासाठी किंवा कोणतं संकट टीम इंडियावर कोसळलं?, हे प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहेत. बीसीसीआयनं त्याचं उत्तर दिलं आहे.  india vs england 4th test, india vs england 4th test live

Akeal Hoseinच्या कॅचमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, पण पोलार्डचा संघ ६ धावाही नाही करू शकला, Video

तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती आणि सामना संपल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये दुखापतीचे स्कॅनसाठी गेला. पण, तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांनी कालच स्पष्ट केले होते. विराटनं त्याला पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांना दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले. त्यांच्या जागी उमेश यादव व शार्दूल ठाकूर यांची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली. आर अश्विन हाही सामना पेव्हेलियनमध्ये बसूनच पाहणार आहे. इंग्लंडच्या संघात ऑली पोप व क्रिस वोक्स यांचे पुनरागमन झाले आहे. जोस बटलर व सॅम कुरन यांना विश्रांती देण्यात आले आहेत. india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard

भारतीय खेळाडूंनी का बांधल्या काळ्या फिती? 

मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि युवा खेळाडूंची गुणवत्ता अचूक हेरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक दर्जेदार क्रिकेटपटू देणारे वासू परांजपे यांचे सोमवारी मुंबईत वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खेळाडूंनी ही काळी फित बांदली. परांजपे यांनी १९५६ ते १९७० दरम्यान २९ प्रथम श्रेणी सामने खेळताना मुंबईसह बडोदा संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. लिटल मास्टर सुनील गावसकर यांना ‘सनी’ हे टोपणनाव परांजपे यांनीच दिले होते.

मुंबईच्या १२ रणजी विजेतेपदांमध्ये सहभाग असलेल्या परांजपे यांनी कारकिर्दीत ७८५ धावांसह नऊ बळीही घेतले.  १९६४-६५च्या रणजी मोसमात बडोदाविरुद्ध केलेली १२७ धावांची खेळी त्यांची सर्वोत्तम खेळी ठरली. केवळ गावसकरच नाही तर दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व रोहित शर्मा अशा दिग्गजांच्या कारकिर्दीमध्ये परांजपे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. india vs england 4th test live udates, ind vs eng live test match, ind vs eng live score, 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माविराट कोहली
Open in App