India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : जळपास वर्षभरानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पटकावणाऱ्या उमेश यादवनं ( Umesh Yadav) दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडला झटपट दोन धक्के दिले. भारताच्या पहिल्या डावातील १९१ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा निम्मा संघ ६२ धावांवर माघारी परतला होता. ऑली पोप व जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी करताना इंग्लंडला शतकी पल्ला ओलांडून दिला. या दोघांनी ७ चौकार खेचून दोन षटकांत महत्त्वपूर्ण २८ धावा जोडल्या. पण, त्याचवेळी टीम इंडियाचा इंग्लिश फॅन जोर्व्हो ( Jarvo) पुन्हा मैदानात घुसला. या मालिकेत क्रिकेटपटूंपेक्षा अधिक काळ जार्व्हो चर्चेत राहिला आहे आणि यावेळी त्यानं गोलंदाजी केली.
विराट कोहलीनं इतिहास रचला; आशियात कोणालाच जमला नाही असा विक्रम!
ओव्हल कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या गोलंदाजांनी गाजवला. टीम इंडियाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळून यजमानांनी दिवसअखेर ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. रोरी बर्न्स ( ५) व हसीब हमीद ( ०) यांना इंग्लंडला चांगली सुरुवात करून देता आली नाही. फॉर्मात असलेल्या जो रूट व डेवीड मलान या जोडीनं इंग्लंडला सावरले. त्यानं मलानसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६९ चेंडूंत ४६ धावा जोडल्या. २५ चेंडूंत २१ धावा करणाऱ्या रूटची एकाग्रता मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या उमेश यादवनं भंग केली. उमेशच्या अप्रतिम इनस्वींग चेंडूनं रूटचा त्रिफळा उडवला. india vs england 4th test, india vs england 4th test live
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात उमेश यादवनं दोन विकेट्स घेतल्या. पहिले त्यानं क्रेग ओव्हर्टनला ( १) बाद केले आणि त्यानंतर डेवीड मलानचा ( ३१) अडथळा दूर केला. जॉनी बेअरस्टो व ओली पोप क्रिजवर असताना उमेश गोलंदाजीसाठी तयारच होत होता तितक्यात जार्व्हो पुन्हा सुरक्षारक्षकांना चकवून मैदानावर घुसला अन् गोलंदाजीसाठी धावत सुटला. यावेळी त्यानं नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या ओली पोपला धडकही दिली. india vs england 4th test live score,
पाहा व्हिडीओ...