India vs England 4th test Live : लोकेश राहुल- रोहित शर्मा यांचा मोठा पराक्रम; हिटमॅननं पूर्ण केल्या १५००० आंतरराष्ट्रीय धावा!

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : चौथ्या कसोटीत इंग्लंडनं ओली पोप व ख्रिस वोक्स यांना संघात स्थान दिले. या दोघांनीच टीम इंडियाचे कंबरडे मोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 11:05 PM2021-09-03T23:05:13+5:302021-09-03T23:06:10+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th test Live : KL Rahul and Rohit Sharma break 85 years old record, India closes Day 2 with 43/0 | India vs England 4th test Live : लोकेश राहुल- रोहित शर्मा यांचा मोठा पराक्रम; हिटमॅननं पूर्ण केल्या १५००० आंतरराष्ट्रीय धावा!

India vs England 4th test Live : लोकेश राहुल- रोहित शर्मा यांचा मोठा पराक्रम; हिटमॅननं पूर्ण केल्या १५००० आंतरराष्ट्रीय धावा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी संयमी सुरुवात केली. रोहितला जीवदान मिळालं आणि त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला.

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : चौथ्या कसोटीत इंग्लंडनं ओली पोप व ख्रिस वोक्स यांना संघात स्थान दिले. या दोघांनीच टीम इंडियाचे कंबरडे मोडले. ५ बाद ६२ अशा दयनीय अवस्थेत असलेल्या इंग्लंडसाठी पोव व जॉनी बेअरस्टो ही जोडी धावून आली. त्यानंतर पोपनं चतूर खेळ केला. वोक्सनं अखेरच्या विकेटसाठी तुफान फटकेबाजी करताना इंग्लंडला पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडनं पहिल्या डावात २९० धावा केल्या. उमेश यादवनं सर्वाधिक ३, तर रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारतानं दुसऱ्या डावात बिनबाद ४३ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा २० व लोकेश राहुल २२ धावांवर खेळत आहेत.  या जोडीनं आज १९३६ सालचा विक्रम मोडला. 

५ फलंदाज ६२ धावांवर माघारी परतूनही इंग्लंडनं चौथ्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळवलं. ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांच्या ८९ धावांच्या भागीदारीनं इंग्लंडनं आघाडीच्या दिशेनं वाटचाल केली. बेअरस्टो बाद झाला, परंतु पोपला अष्टपैलू मोईन अलीची साथ मिळाली. संघात कमबॅक करणाऱ्या ख्रिस वोक्सनं गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही तुफान फटकेबाजी केली. शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संघासाठी देवासारखा धावला. त्याच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात पोप त्रिफळाचीत झाला. त्यानं १५९ चेंडूंत ८१ धावा काढल्या. india vs england 4th test, india vs england 4th test live


इंग्लंडचा डाव गुंडाळण्यात भारताला थोडे कष्ट घ्यावे लागले. ख्रिस वोक्सनं फटकेबाजी केली. वोक्सनं ५८ चेंडूंत ११ चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. पण, एक धाव काढण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. ५ बाद ६२ धावांवरून इंग्लंडनं २९० धावांची मजल मारून पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली.  india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard

दुसऱ्या डावात रोहित शर्मालोकेश राहुल यांनी संयमी सुरुवात केली. रोहितला जीवदान मिळालं आणि त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला. (Rohit Sharma completes 15,000 international runs.)

लोकेश व रोहित यांनी यावेळी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये दुसरे स्थान पटकावले. लोकेश व रोहित यांनी या मालिकेत ३६७* धावांची भागीदारी केली आहे. इंग्लंडमध्ये सर्वात यशस्वी भारतीय सलामीवीरांमध्ये सुनील गावस्कर व चेतन चौहान ही जोडी आघाडीवर आहे. त्यांनी १९७९च्या मालिकेत ४५३ धावा जोडल्या होत्या. रोहित व लोकेश यांनी ८५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९३६मध्ये विजय मर्चंट व सय्यद मुश्ताक अली यांनी ३६६ धावा जोडल्या होत्या. ( Rahul & Rohit have gone past an illustrious opening pair, Most runs by an Indian opening pair in a series in ENG)  india vs england 4th test live udates, ind vs eng live test match

Web Title: India vs England 4th test Live : KL Rahul and Rohit Sharma break 85 years old record, India closes Day 2 with 43/0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.